27 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरक्राईम112 महाराष्ट्र: आता पोलिसांकडे व्हॉट्स ॲपनेही तक्रार करता येणार; सोशल मीडियातूनच मिळवा...

112 महाराष्ट्र: आता पोलिसांकडे व्हॉट्स ॲपनेही तक्रार करता येणार; सोशल मीडियातूनच मिळवा तातडीची मदत!

सोशल मीडियातून फेसबुक, ट्विटरबरोबरच ईमेलद्वारे केलेल्या तक्रारींचीही एकत्रित प्रणाली; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले लोकार्पण

112 महाराष्ट्र द्वारे पोलिसांकडे तक्रार करणे आता सोपे झाले आहे. (112 Maharashtra) नागरिकांना आता पोलिसांकडे व्हॉट्स ॲपनेही तक्रार करता येणार आहे. शिवाय सोशल मीडियातूनच तातडीची मदतही मिळवता येणार आहे. त्यासाठी फेसबुक, ट्विटरबरोबरच ईमेलद्वारे केलेल्या तक्रारींवर कृती करण्यासाठी एकत्रित प्रणाली विकसित करण्यात आली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या इंटीग्रेटेड कार्यप्रणालीचे लोकार्पण केले.

पुण्यात राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची गुन्हे व कायदा-सुव्यवस्था यासंबंधी परिषद सुरू आहे. या परिषदेपूर्वी फडणवीस यांच्या हस्ते प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल 112 चे लोकार्पण केले गेले. या कार्यप्रणालीत आता फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स ॲप, ईमेल या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. महिंद्रा डिफेन्स सर्व्हिसेसने महाराष्ट्र पोलिसांसाठी ही प्रणाली विकसित केली आहे.

सोशल मीडियातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा आणि त्यावर त्वरित कार्यवाही, प्रतिसादासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची रचना करण्यात आली आहे. यामुळे पीडितापर्यंत तातडीने मदत पोहोचू शकणार आहे. फेसबुक, ट्विटरवर “112 महाराष्ट्र” या नावाने हँडल त्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर अन्य तपशीलही उपलब्ध आहे. यामुळे नागरिक आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही पोलिसांकडे आपली तक्रार नोंदवू शकतात. याशिवाय, सोशल मीडियातूनच पोलिसांकडे तातडीची मदतही मागता येऊ शकेल. यामुळे आणखी एका जलद प्रतिसाद सेवेची महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत भर पडली आहे.

डायल-112 प्रणालीतून आतापर्यंत सुमारे साडेअकरा लाख तक्रारी हाताळण्यात आल्या आहेत. यातील तब्बल अडीच लाख तक्रारी महिलांशी संबंधित होत्या. या प्रणालीतून सरासरी दररोज 19 हजारांहून अधिक कॉल्स प्राप्त होतात. त्यापैकी दैनंदिन सुमारे 2800 तक्रारींचा निपटारा केला जातो. आता यात महाराष्ट्र पोलिसांचे सिटीझन पोर्टल, सिटिझन मोबाईल ॲप, एसओएस, ई-मेल, ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्स ॲप या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे पोलिसांकडील तक्रारींचा जलद गतीने निपटारा करणे शक्य होणार आहे.

पुण्यातील पोलिस अधिकारी परिषद

हे सुद्धा वाचा :

कामाची बातमी : घरमालकांना मोठा दिलासा अन् भाडेकरूंची कटकटीतून मुक्तता

मुंबई पोलीस दलात ‘विशेष पोलीस आयुक्त’ पदाची निर्मिती, पहिला मान देवेन भारती यांना!

पोलिस अधिकारी बदल्यांचा घोळ सुरूच; गृह विभागाने तीन दिवसात फिरवला आदेश!

VIDEO : पुणे पोलिसांनी रोलरखाली चिरडले जप्त केलेल्या गाड्यांचे सायलेन्सर

112 Maharashtra , Police Complaint on WhatsApp, पोलिसांकडे व्हॉट्स ॲपनेही तक्रार, 112 महाराष्ट्र, डायल 112

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी