33 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरक्राईमहृदयद्रावक: 26 वर्षीय तरुणाचा भरतीदरम्यान कोसळून मृत्यू; पोलिस बनण्याचे स्वप्न राहिले अधुरे

हृदयद्रावक: 26 वर्षीय तरुणाचा भरतीदरम्यान कोसळून मृत्यू; पोलिस बनण्याचे स्वप्न राहिले अधुरे

पोलीस दलात दाखल होण्याचे स्वप्न उराशी बांधून मुंबईत आलेल्या 26 वर्षीय तरुणाचा भरती प्रक्रियेदरम्यान अकस्मित मृत्यू झाला आहे. धावतीची अंतिम रेषा ओलांडल्यानंतर जमिनीवर कोसळून त्याच्यावर काळाचा घात झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कित्येकजण अहोरात्र मेहनत घेतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. पोषण आहार, ऊंची, शरीरयष्टी याकडे लक्ष देतात. पोलिस बनून समाजकार्य करण्याचा त्यांचा मानस असतो. मात्र नियतीच्या नशिबी तर काहीतरी वेगळेच लिहिलेल असतं. पोलिस भरतीच्या चाचणीत धावतीची अंतिम रेषा ओलांडल्यानंतर 26 वर्षाचा तरुण जमिनीवर कोसळला आणि त्याच्यावर काळाचा घाला झाला. परीक्षेदरम्यानच या तरुणाचे अकस्मित मृत्यू झाल्याने त्याचे पोलिस बणण्याचे स्वप्न मात्र अधुरे राहिले. ही हृदयद्रावक घटना मुंबई येथील कलिना विद्यापीठात पोलिस भरतीच्यावेळी सकाळी घडली आहे. (Mumbai Police Recruitment)

मूळचा वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेला गणेश उगले (26 year old Ganesh Ugale) हा अन्य तरुणांसोबत मुंबई पोलीस दलातील शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता. शुक्रवारी सकाळी तो कलिना विद्यापीठाच्या मैदानावर चाचणीसाठी दाखल झाला. त्याने १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली आणि अंतिम रेषा ओलांडल्यानंतर लगेचच तो जमिनीवर कोसळला. भरती प्रक्रियेसाठी उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने तात्काळ त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वी त्याला मृत घोषित करण्यात आले. मृत्युचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि त्याच्या चुलत भावाने मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज केला होता. गुरुवारी हे दोघेही मुंबईत आले होते. रात्री तंबुत राहिल्यानंतर शुक्रवारी सकाळी उठून ते भरती प्रक्रियेत सहभागी झाले. सकाळी पावणेअकराच्या सुमारास उगले १६०० मीटर धावण्याच्या चाचणीत सहभागी झाला होता. त्याने ही चाचणी पूर्ण केली आणि अंतिम रेषा ओलांडताच तो कोसळला. वैद्यकीय पथकाने उगले याची तपासणी केली आणि तात्काळ त्याला उपचारांसाठी सांताक्रूझ येथील व्ही.एन. देसाई रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेने सर्वानाच धक्का बसला. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली.

हे सुद्धा वाचा: धक्कादायक : पोलिस ठाण्याच्या आवारातच तरुणाने पेटवून घेतले

विद्यार्थ्याने वाहतूक पोलिसाला नेले एक किलोमीटरपर्यंत फरफटत

जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांच्या ‘थेट भरती’ची प्रतीक्षा कायम

पोलीस दलात दाखल होण्याचे स्वप्न उराशी बांधून दोघेही भरतीत सहभागी झाले होते. मात्र, गुरुवारी रात्री एकत्र राहिल्यानंतर सकाळी गणेशच्या मृत्युने चुलत भावासह कुटुंबीयांना धक्का बसला आहे. पोलिसांनी गणेश याच्या चुलत भावाकडे चाैकशी केली असता, त्याने कोणत्याही अस्वस्थतेची तक्रार केली नव्हती. पोलिसांनी मृत उमेदवार गणेश याच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी