34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्राईमएनसीबीच्या कारवाईत 6 कोटीच ड्रग्स जप्त; पुण्याच्या मेडिकल स्टोरमध्ये मिळताहेत बंदी घातलेली...

एनसीबीच्या कारवाईत 6 कोटीच ड्रग्स जप्त; पुण्याच्या मेडिकल स्टोरमध्ये मिळताहेत बंदी घातलेली औषध

एनसीबीच्या मुंबई झोन ने दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत.एका कारवाईत गोवा येथून एक किलो कोकेन जप्त केलं आहे.तर दुसरी कारवाई पुण्यात केली आहे. पुण्यातील मेडिकल स्टोर मध्ये बंदी घातलेली औषध ड्रग्स म्हणून विकली जात असल्याच उघडकीस आलं आहे.

एनसीबीच्या मुंबई झोन ने पुण्यात मोठी कारवाई केली आहे.पुण्यात पर्सलच्या माध्यमातून ड्रग्स तस्करी केली जात असल्याच उघडकीस आलं आहे.पुण्यात एक पार्सल पाठवण्यात आलं होतं.हे पार्सल बिहार येथून आलं होतं.या पार्सल मध्ये निट्राझेपल हे बंदी घातलेलं औषध होत.याबाबत एनसीबी च्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी पुण्यात सापळा लावला होता.प्रथम पार्सल च्या दुकानाच्या आजूबाजूला हा सापळा लावला होता. पार्सल घ्यायला कोण येतंय याची अधिकारी वाट पहात होते.यावेळी सागर बी आणि राजेश बीसी हे दोघे पार्सल घ्यायला आले होते. सागर याच्या नावाने पार्सल आलं होतं.तर राजेश बीसी हा हे पार्सल घेणार होता.राजेश बीसी याचा पुण्यात मेडिकलचा मोठा व्यवसाय आहे. तर हे पार्सल तिसऱ्याच व्यक्ती स्वराज बी याला देण्यात येणार होत.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रथम सागर बी आणि राजेश बीसी याला अटक केली. त्यांच्या माहित स्वराज बी याच नाव आल्यानंतर त्याला ही अटक करण्यात आली. स्वराज बी याच पुण्यात मेडिकल स्टोर आहे. निट्राझेपल हे बंदी घातलेलं औषध आहे.मात्र,त्याचा नशा करण्या साठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याच उघडकीस आलं आहे.

हे सुद्धा वाचा

अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार प्रकरणी वृध्दाला 10 वर्ष शिक्षा

कोल्हापूर येथील संपत्तीच्या वादातून तरुणांची मुंबईत हत्या.मामे भावाने केली हत्या.

अजित पवार यांची पहिली प्रतिक्रीया; शरद पवारांच्या निर्णयावर काय म्हणाले ?

दुसरी कारवाई गोवा येथे करण्यात आली आहे. गोवा विमानतळ येथून नायजेरियन नागरिक असलेल्या सॅम्युअल आला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडे 1 किलो 9 ग्राम कोकेन सापडलं आहे.तो जॉन्सबर्ग येथून व्हाया दुबई मार्गे भारतात आला होता.तो हे कोकेन दिल्ली येथे एका व्यक्तीला देणार होता.एनसीबी अधिकाऱ्यांना दिल्ली बाबत माहिती मिळताच तिथल्या युनिटने सॅम्युअल याच्या साथीदाराला अटक केली.त्याच नाव जेम्स इसी अस आहे.बॅगेच्या खालच्या ट्रॉली मध्ये चोर कप्पे बनवण्यात आले होते.त्यात हे कोकेन दोन पाकिटात ठेवण्यात आलं होतं.

6 Crore drugs seized in NCB action
Banned drugs are available in medical stores in Pune

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी