30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeक्राईमईडीने केली 91 कोटींची मालमत्ता जप्त

ईडीने केली 91 कोटींची मालमत्ता जप्त

ईडीने HPZ कंपनीवर विविध ठिकाणी धाडी टाकून आणि चौकशी करून सुमारे 91 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. HPZ ही कम्पनी क्रिप्टो करन्सीचा अॅप चालवते. कंपनी बाबत अनेक तक्रारी आहेत. कंपनी विरोधात कोहिमा,नागालँड येथे गुन्हा दाखल आहे. हाच गुन्हा आता ईडीने तपास करण्यासाठी घेतला आहे. कंपनीचा मालक हा भुपेश अरोरा हा आहे.

ऍप बाबत अनेक तक्रारी असल्याने ईडीने काही दिवसांपूर्वी बँक आणि कार्यलयाच्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या.बँक या काही आरोपी नाहीत. मात्र, त्यांच्याकडे व्यवहाराची कागदपत्रे, सविस्तर माहिती असल्याने आम्ही त्याची तपासणी केली, अस ईडीच्या अधिकऱ्यांचं म्हणणं आहे.यावेळीच बँक आणि पैशाचे व्यवहार करणारे ऍप यांच्याकडे कंपनीचे 91 कोटी रुपये असल्याचं उघडकीस आलं. हा सर्व पैसा मनी लोंदरिंगचा असल्याचं ही ईडीच्या अधिकऱ्यांचं म्हणणं आहे.आणि याचमुळे हा सर्व पैसा आणि मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

ही कंपनी वेगळ्या पद्धतीने काम करायची. इन्व्हेस्टमेंट च्या बदल्यात क्रिप्टो करन्सी द्यायची.इन्व्हेस्टमेंट वर भरपूर परतावा देण्याचं आमिष ही दाखवायची.मात्र, आपलं आश्वासन काही कंपनी पूर्ण करत नव्हती.याबाबत कोहिमा, नागालँड इथे कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात कंपनी विरोधात, कंपनी कशी फसवणूक करत आहे, याची माहिती आहे.

हे देखिल वाचा

राज्याच्या तिजोरीत खडखडाट; धनादेशांचे वितरण रोखले!

खारघर उष्माघात मृत्यू प्रकरणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

हिंदुस्थानचा पुत्र, पाकिस्तानी लेखक तारिक फतेह यांची प्राणज्योत मालवली

 

याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने आपला तपास सुरू केला होता.त्यात त्यांना मालमत्ता आणि व्यवहाराची कार्यपद्धती सापडली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात ईडीने अजून कोणालाही अटक केलेली नाही.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी