30.9 C
Mumbai
Sunday, May 14, 2023
घरक्राईममहिलांच्या घोळक्याला धडक, पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव गाडीने ५ महिलांना चिरडले: चालक फरार

महिलांच्या घोळक्याला धडक, पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव गाडीने ५ महिलांना चिरडले: चालक फरार

बसमधून उतरून रस्ता ओलांडत असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने १७ जणांच्या महिलांच्या गटाला बेदरकारपणे गाडीने चिरडल्यामुळे यातील पाच महिलांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात १२ महिला गंभीर रित्या जखमी झाल्या असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे-नाशिक महामार्गावर (Pune-Nashik Highway) राजगुरूनगर नजीक सोमवारी रात्री ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर चालक वाहनासकट अपघातस्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. पुणे शहरापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या खेड तालुक्यातीळ शिरोळी गावानजीक रात्री ११.०० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. बसमधुन खाली उतरल्यानंतर रास्ता ओलांडत असताना ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींपैकी दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (A group of women was hit, 5 women were crushed by a speeding train on the Pune-Nashik highway)

“१७ महिलांचा हा गटाला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेनंतर वाहनचालक त्या ठिकाणाहून पसार झाल्यामुळे त्याची ओळख अद्याप समजू शकली नाही. या अपघातात पाच महिलांचा मृत्यू झाला असून १२ महिलांवर उपचार सुरु आहेत. संबंधित वाहनचालकांचा आम्ही शुद्ध घेत असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल,” असे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले. पोलीस उप अधीक्षक सुदर्शन पाटील यांनी सांगितले की, अपघातानंतर सर्व १७ जणींना रुग्णवाहिनीतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. खेडमधील रुग्णालयात त्यापैकी चार महिलांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर पुण्यातील ससून रुग्णालयात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.”

घटनास्थळापासून जवळच असलेल्या मंगल कार्यालयात स्वयंपाकाचे काम करण्यासाठी या महिला आल्या होत्या. मध्यरात्री त्यांचे काम आटोपून पुण्याहून येणाऱ्या बसमधून खरपुडी फाटा येथे उतरल्या. पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे रस्ता ओलांडत असताना या महिलांच्या घोळक्याला वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यातील तीन ते चार महिला काही फुटांवर जाऊन पडल्या.

हे सुद्धा वाचा

VIDEO : रेल्वे रुळांमध्ये आणि भोवती खडी का असते जाणून घ्यायचेय…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला राजा समजू लागलेत!

जिऱ्याच्या फोडणीला बसतोय महागाईचा तडका; हे आहे कारण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी