29 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeक्राईमUnderworld Dawn : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची निर्दोष मुक्तता

Underworld Dawn : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची निर्दोष मुक्तता

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची मुंबईतील दुहेरी हत्त्याकांडप्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. राजनसह त्याच्या तीन साथीदारांना देखील या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली. छोटा राजन आणि त्याच्या साथीदारांवरील गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी तपास यंत्रणेला अपयश आल्याचा ठपका देखील न्यायालयाने ठेवला.

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची मुंबईतील दुहेरी हत्त्याकांडप्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. राजनसह त्याच्या तीन साथीदारांना देखील या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली. छोटा राजन आणि त्याच्या साथीदारांवरील गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी तपास यंत्रणेला अपयश आल्याचा ठपका देखील न्यायालयाने ठेवला.

29 जुलै 2009 साली मुंबईतील जेजे सिग्नल जवळ छोटा शकील याच्या टोळीतील आसिफ दधी उर्फ छोटे मिया आणि शकील मोडक यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या हत्याकांडाचा सुत्रधार छोटा राजन असल्याचा त्याच्यावर आरोप होता. राजन सोबत त्याचे साथीदार मोहम्मद अली जान, प्रणय राणे, उम्मेद हे तिघेही आरोपी होते. या सर्वांना अटक करुन त्यांच्यावर खटला भरला होता. या खटल्याची सुनावणी झाली. त्यात तपास यंत्रणेला पुराव्यानिशी गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्याचे सांगत मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

न्यायालयाने असे ही म्हटले की, सरकारी तपास यंत्रणेच्या हाती गुन्हा सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे हाती लागले नाहीत. तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या गोळ्या आणि शस्त्रे देखील जुळत नाहीत. इतकेच काय ओळख परेडमध्ये देखील तपास यंत्रणा अपयशी ठरली, असे न्यायालयाने म्हटले आहे. २०१५ मध्ये छोटा राजनला इंडोनेशियातून भारतात आणण्यात आले होते. तेव्हापासून राजन विरोधातील खटल्यांची सुनावणी कोर्टात सुरू आहे.
– हे सुद्धा वाचा :

Rahul Shewale : ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात बंद करावी : राहुल शेवाळे

PHOTO: या सहा सोप्या सवयी ठेवतील तुम्हाला निरोगी

Eknath Shinde Prakash Ambedkar Meeting:एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकरांच्या घरी; काय झाली चर्चा?

राजन नायर उर्फ बडा राजन याचा 1983 साली चंद्रशेखर सफालिका आणि अब्दुल कुंजू या दोघांनी खून केला. त्यानंतर बडा राजनचा बदला घेण्याच्या सुडाने राजन निकाळजे उर्फ छोटा राजन पेटला. यातूनच त्याचा गुन्हेगारी जगतातील वावर वाढत गेला, पुढे तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहिम याच्या संपर्कात आला आणि तो दाऊद इब्राहिम सोबत काम करू लागला. मात्र १९९३ च्या बॉम्बफोटानंतर दोघेही वेगळे झाले.

छोटा राजन गुन्हेगारी जगताबरोबरच मुंबईतील रिअल इस्टेटमध्ये देखील व्यवसाय करत होता. तो देशाबाहेर असला तरी त्याची टोळी भारतात काम करत होती. त्याचा रिएल इस्टेटचा व्यवसाय त्याची पत्नी सुजाता निकाळजे ही सांभाळत होती. मुंबईत रिअल इस्टेटच्या व्यवसायातून देखील त्याने मोठ्याप्रमाणाता पैसा कमविला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी