20 C
Mumbai
Wednesday, January 18, 2023
घरक्राईमअभिनेत्री तुनिशा आत्महत्या प्रकरण; आरोपी झीशानने सांगितले ब्रेकअपचे कारण

अभिनेत्री तुनिशा आत्महत्या प्रकरण; आरोपी झीशानने सांगितले ब्रेकअपचे कारण

टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या (Actress Tunisha suicide) प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे.  तुनिशाचा एक्स बॉयफ्रेंड आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी शीझान खान (Sheezan Khan) याने सांगितले की, दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर प्रकरणामुळे आपण तुनिशासोबतचे प्रेमसंबंध तोडले. श्रद्धा वालकरचा प्रियकर अफताब पूनावाला याने श्रद्धाचा खुन (Shraddha walker suicide case) केल्यानंतर देशभरात जे वातावरण निर्मान झाले होते. त्यामुळे अस्वस्थ झाल्यामुळे तुनिशासोबत नाते संपविण्याचा निर्णय घेतल्याचे शीझान याने पोलिसांना सांगितले.

वालीव पोलीसांना शीझान याने आपल्या जबाबात सांगितले की, आमच्या दोघांचे धर्म वेगळे होते तसेच दोघांच्या वयात देखील खुप अंतर असल्याने मी तुनिशासोबतचे नाते संपविले. तसचे जबाबात त्याने हे देखील सांगितले की तुनिशाने यापूर्वी देखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मी तीला वाचवले होते आणि तुनिशाच्या आईला तिची काळजी घेण्याचे देखील सांगितले होते.
अभिनेत्री तुनिशाच्या आईने शीझान याच्याविरोधात तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शीझान विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून सध्या शीझान पोलीस कोठडीत आहे. सोमवारी तुनिशाच्या आईने एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात तीने शीझानला कठोर शिक्षा व्हावी असे म्हटले आहे.
तुनिशाच्या आईने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, शीझानने तुनिशाची फसवणूक केली. त्याने तिच्याशी संबंध ठेवले. तिला लग्न करण्याचे वचन दिले. शीझानने तुनिशाचा तीन ते चार महीने वापर केला. तो दुसऱ्या महिलेच्या संपर्कात असताना देखील त्याने तुनिशासोबत डेट केले. मी माझी मुलगी कायमची गमावली आहे. शीझानला सोडू नका इतकेच माझे आता सांगणे आहे.
हे सुद्धा वाचा

सुपर मंडे : शेयर बाजाराने गुंतवणूकदारांना मालामाल केले; 6 लाख कोटी रुपयांची कमाई !

दिव्यांगांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मिळणार मोफत उपचार, विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

शेतमालाच्या निर्यातीमध्ये यंदा मोठी वाढ; गहू, तांदळासह या वस्तूंना परदेशातून मागणी

दरम्यान शीझान याने गेल्या पंधरादिवसांपूर्वी तुनिशासोबत नाते तोडल्याचे सांगण्यात येते. ते दोघे वेगळे झाल्यानंतर तुनिशा प्रचंड तणावाखाली होती अशी देखील माहिती पुढे आली आहे. या सगळ्याप्रकारानंतर तुनिशाने वसईतील एका स्टुडीओमध्ये मालिकेच्या सेटवर बाथरुममध्ये आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अनेकांनी हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचा दावा केला असला तरी पोलिसांनी मात्र त्यास दुजोरा दिलेला नाही. या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!