33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeक्राईमShraddha Murder Case : आफताबची होणार नार्को टेस्ट; न्यायालयाने दिले आदेश

Shraddha Murder Case : आफताबची होणार नार्को टेस्ट; न्यायालयाने दिले आदेश

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात साकेत न्यायालयाने रोहिणी फॉरेन्सिक सायन्स लॅबला आरोपी आफताब पूनावालाची पाच दिवसांत नार्को चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात साकेत न्यायालयाने रोहिणी फॉरेन्सिक सायन्स लॅबला आरोपी आफताब पूनावालाची पाच दिवसांत नार्को चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी अफताब पूनावाला याने मे महिन्यात श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून सुमारे तीन आठवडे 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले होते.
आरोपीची नोर्को टेस्ट करायची असल्यास त्यासाठी आरोपीची देखील परवानगी घेणे आवश्यक असते. आरोपी आफताब पूनावाला याला नोर्को टेस्टसाठी विचारले असता त्याने नार्को टेस्टला माझी संमती असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आफताबची नार्कोटेस्ट करण्यासाठी आता न्यायालयाने देखील आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांनी आफताबवर थर्ड डिग्रीचा वापर करू नये असे आदेश देखील पोलिसांना दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनावालाने 18 मे रोजी संध्याकाळी त्याची ‘लिव्ह-इन पार्टनर’ श्रद्धा वालकर (27) हिचा गळा दाबून खून करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर सुमारे 18 दिवस ते तुकडे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील जंगलात फेकून दिले. पोलिसांनी आतापर्यंत श्रद्धाच्या मृतदेहाचे 13 तुकडे जप्त केले असून त्यात बहूातंश शरिराची हाडे आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपासासंदर्भात पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक शुक्रवारी गुरुग्रामला पोहोचले. आरोपीने श्रद्धाच्या कुजलेल्या मृतदेहाचे तुकडे, हत्यारे किंवा या प्रकरणाशी संबंधित काही त्याच्या कार्यालयाच्या आसपासच्या भागात फेकून दिले होते का, याचा शोध घेण्यात आला. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात पुढील काही दिवसांत आरोपी पूनावाला याला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि इतर ठिकाणी नेण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा:

सचिन वाझेला जामीन मंजूर; पण मुक्काम तुरूंगातच

Aditya Thackeray : मुंबईत चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणाच्या आदेशाने? आदित्य ठाकरेंचा सवाल

VIDEO : भारत जोडो यात्रेत आई चिमुकल्यांसह सहभागी

दरम्यान श्रद्धा वालकर हीचे व्हॉट्सअॅप चॅट देखील समोर आले आहे. त्यामध्ये असे दिसून येते की, अफताब श्रद्धाला मारहाण तर करत होताच पण तिचे मानसिक शोषण देखील तो करत होता. श्रद्धा आणि तिच्या मित्रामध्ये व्हाटस् अपवर झालेले चॅट सध्या व्हायरल झाले आहे. यामध्ये ती अफताब आपला कसा छळ करत आहे हे मित्राला सांगत आहे. आफताबने मला खुप मारल्यामुळे मी बेडवरून उठू देखील शकत नसल्याचे तीने यामध्ये म्हटले आहे. तसेच आफताबने श्रद्धाला केलेल्या मारहाणीचा फोटो देखील समोर आला आहे. या फोटोमध्ये तीने आफताबने मारहाण केल्यानंतरच्या जखमा दाखवल्या आहेत. श्रद्धा वालकर हत्याप्रकरणामुळे सारा देश हादरून गेला असून आफताबला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील अनेक राजकीय नेत्यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी