34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्राईमअबब : पत्नीनेच दिली नवऱ्याच्या खुनाची सुपारी !

अबब : पत्नीनेच दिली नवऱ्याच्या खुनाची सुपारी !

शहरात गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा घालण्यासाठी आणि एक आदर्श सुरक्षाप्रणाली विकसित करण्यासाठी पोलिस सुरक्षकांची आपल्याला खूप मोठी मदत होते. पोलिस आपल्या सुरक्षेचे दूत आहेत. पण जेव्हा पोलिसच आपले शत्रू बनतात तेव्हा मात्र सामान्य माणसाची पार विटंबना होते. या प्रकरणात मात्र खुद्द पोलिस पत्नीनेच पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात घडली आहे. (Amit Bhosale murder by his Police wife in Satara)

वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित आप्पासाहेब भोसले (वय 38, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पोलीस दलात कार्यरत असणारी पत्नी रागिणी यांच्यासह सहाजणांना अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. शहरालगत वाढे फाटा येथे सोमवारी दि. 23 जानेवारी रोजी मध्यरात्री उशिरा अमित भोसले यांचा फायरिंग करत गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी एकूण सहा गोळ्या भोसले यांच्यावर झाडल्यानंतर तद्नंतर पुन्हा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेने सातारा शहरात मोठी खळबळ उडाली आहे. भोसले यांचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे पत्नीनेच त्यांच्या खुनाची सुपारी दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.

सातारा तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक (Satara Taluka Police and Local Crime Branch) घटनेचे गांभीर्य ओळखून संशयितांचा शोध घेत होते. याप्रकरणी पोलिसांनी अमित भोसले यांची पत्नी रागिणी अमित भोसले यांच्यासह सुरज ज्ञानेश्वर कदम (रा. खेड, सातारा), अभिषेक विलास चतुर (रा. नांदगिरी, ता. कोरेगाव), शुभम हिंदुराव चतुर (रा. कोरेगाव, सध्या पुणे), राजू भीमराव पवार (रा. पंताचा गोट, सातारा), सचिन रमेश चव्हाण (रा. मुळशी, पुणे) यांना अटक करून एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक मोहन शिंदे, पोलीस निरीक्षक अरूण देवकर, विश्वजीत घोडके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

नेमक प्रकरण काय?

अमित भोसले सोमवार दि. 23 जानेवारी रोजी रात्री त्यांच्या मैत्रिणीसोबत कारमधून वाढे फाटा येथे जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर त्यांची मैत्रीण कारमध्ये बसली असताना अमित हात धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांचा गळा चिरल्याने जागीच मृत्यू झाला. हा प्रकार कारमधील त्यांच्या मैत्रिणीच्या लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड केला. परंतु, तोपर्यंत हल्लेखोर तेथून पसार झाले होते. या प्रकाराची माहिती सातारा शहर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा वाढे फाट्याकडे रवाना झाला होता.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्यांना संशयितांची चेहरेपट्टी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरूवात केली होती. मात्र, संशयित सातारा, पुणे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, लातूर, अलिबाग, इंदूर, उज्जैन याठिकाणी फिरत असल्याने नेमके लोकेशन मिळण्यास पोलिसांना अडचण येत होती. दरम्यान, या खून प्रकरणातील काही संशयित गोवा राज्यात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना मिळाल्याने त्यांनी भुईंजचे सपोनि रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमून तातडीने कारवाईच्या सूचना केल्या होत्या. मात्र, गर्जेसह पथकाला गोव्यात पोहचण्यास वेळ लागणार असल्याने एसपी समीर शेख यांनी उत्तर गोवा येथील एसपींशी चर्चा करून संशयितांना ताब्यात घेण्यास विनंती केली होती. त्यानुसार गोवा पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले व सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर मृत भोसलेंची पत्नी रागिणी भोसले यांनी सुपारी दिल्यानेच हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी रागिणी यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशीला सुरूवात केली. पती अमित याचे विवाहबाह्य संबध असल्याने तो सतत मारहाण करत असल्यानेच त्याच्या खुनाची सुपारी दिल्याची कबुली रागिणी यांनी दिली. सातारा तालुका पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी ही कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी