29 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरक्राईमनागपूर हादरले! 11 वर्षीय मुलीवर नऊ जणांकडून महिनाभर बलात्कार

नागपूर हादरले! 11 वर्षीय मुलीवर नऊ जणांकडून महिनाभर बलात्कार

टीम लय भारी

नागपूर : नागपूर येथील अवघ्या 11 वर्षीय लहानग्या मुलीवर नऊ नराधमांनी तब्बल महिनाभर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीच्या गरीबीचा फायदा घेऊन घरकामाच्या बाहाण्याने मुलीला बोलवत तिच्यावर जबरदस्ती करून तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेतील जबाबदार 9 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नारपूर येथील उमरेड येथे ही घटना घडली आहे. यामध्ये केवळ 11 वर्षांच्या लहानग्या मुलीला धमकावत, घरकामाचा बहाणा करत नऊ जणांनी वारंवार बलात्कार केला. घरातील मंडळी रागावतील म्हणून या भीतीपोटी तिने घरी काहीच कळू दिले नाही, त्यामुळे याबाबत कोणीच लक्ष दिले नाही किंवा पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दिली नाही. दरम्यान या घटनेबाबत कोणीतरी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी थेट पीडित मुलीलाच गाठून तिच्याकडे याबाबत विचारणा केली.

पोलिसांशी बोलताना पीडित मुलीने लगेचच याबाबत कबुली दिली आणि पोलिसांनी तातडीने यावर कारवाई करत बलात्कार करणाऱ्या नऊ नराधमांना लगेचच ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांकडून आणखी तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा…

पुरेसे इंधन नसताना गाडी चालवली म्हणून वाहतूक पोलिसांनी पाठवले चलन

VIDEO : खो-खो लीगच्या मराठीतील कॉमेंट्रीच्या मागणीसाठी मनसे सोनी पिक्चर्सच्या कार्यालयात

आदेशापूर्वीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार, सुप्रीम कोर्टचा धक्का

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!