30 C
Mumbai
Thursday, May 18, 2023
घरक्राईमलिव्ह-इन-रिलेशनशिपमधील हत्यांचे सत्र थांबता थांबेना... आणखी एका परिचारिकेची हत्या

लिव्ह-इन-रिलेशनशिपमधील हत्यांचे सत्र थांबता थांबेना… आणखी एका परिचारिकेची हत्या

लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका ३७ वर्षीय इसमाने त्याच्या प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह चटईत गुंडाळून ठेवला होता. या प्रकरणी पालघरमधील तुळींज पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मेघा थोरवी (४०) असे मृत प्रेयसीचे नाव असून नालासोपारा येथील विजयनगर परिसरातील एका फ्लॅटमधून तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तुळींज पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरु केला आहे. हार्दिक शहा असे या नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून तो फरार होता. मेघा एका रुग्णालयात परिचारिकेचे काम करत होती. मागील सहा महिन्यांपासून हे दोघे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहात होते. (Another nurse killed who lived in Live-in-relationship)

Another nurse killed who lived in Live-in-relationship
हार्दिक शहा आणि मेघा थोरवी.

 

हार्दिक आणि मेघा राहात असलेल्या फ्लॅटमधून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाल्यानंतर शेजारी राहणाऱ्या लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच मेघा या फ्लॅटमध्ये राहायला आली होती, असे शेजाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर ही हत्या उघडकीस आली. मेघाचा खून केल्यानंतर हार्दिक पाळण्याच्या तयारीत होता. मध्यप्रदेशला जाणाऱ्या ट्रेनमधून मंगळवारी त्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या खुनाचा उलगडा झाला. श्रद्धा वालकर, निक्की यादव आणि आता मेघा शाह या तिघींचा हत्येमागे एक सामान दुवा आहे, तो म्हणजे या तिघी जणी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहात होत्या. समाजातील हे विकृती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

 

हे सुद्धा वाचा

आणखी एक श्रद्धा वालकर : प्रेयसीची हत्या करून मृतदेह ढाब्यातील फ्रिजमध्ये ठेवला

हृदयस्पर्शी: IPS लेकीने केला DGP वडिलांना सॅल्यूट; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

VIDEO : मुंबई बुडणार…! संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचा इशारा

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी