30 C
Mumbai
Thursday, May 18, 2023
घरक्राईमआणखी एक श्रद्धा वालकर : प्रेयसीची हत्या करून मृतदेह ढाब्यातील फ्रिजमध्ये ठेवला

आणखी एक श्रद्धा वालकर : प्रेयसीची हत्या करून मृतदेह ढाब्यातील फ्रिजमध्ये ठेवला

दिल्लीतील हरिदास नगर परिसरात निक्की यादव या तरुणीची तिच्याच नराधम प्रियकराने अतिशय क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह ढाब्यातील फ्रिजमध्ये लपवून ठेवला होता. ज्यावेळी पोलिसांनी चौकशी सुरु केली त्यावेळी ही घटना उघडकीस आली. साहिल गेहलोत असे या विकृत प्रियकराचे नाव आहे. हे दोघे लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ही हत्या केल्यानंतर या भामट्याने दुसऱ्या एका तरुणीसोबत लग्नही केले. या घटनेने लिव्ह-इन रिलेशनच्या तकलादू नात्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आणखी एक श्रद्धा वालकर लिव्ह-इन रिलेशनशिपची बळी पडली आहे… (Another Shraddha Walker: Killed his girlfriend and kept the body in the fridge of the dhaba)

Another Shraddha Walker: Killed his girlfriend and kept the body in the fridge of the dhaba

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या काही दिवस आधीच म्हणजे १० फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी साहिल गेहलोत (२३) याला अटक केली आहे. तो मित्राव गावाचा रहिवाशी होता. तर, निक्की हरयाणातील झज्जर येथील रहिवाशी होती. साहिल दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करणार असल्याचे निक्कीला समजले होते. याबाबत निक्कीने साहिलला जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या दोघांमध्ये खटके उडू लागले. १० फेब्रुवारीलाही दोघांमध्ये जोराचे भांडण झाले. यावेळी राग अनावर झाल्यामुळे साहिलने निक्कीची गळा आवळून हत्या केली. साहिलने गाडीतच हे हत्याकांड केले. आणि नंतर कित्येक तास साहिल निक्कीचे मृत शरीर गाडीतच ठेवून फिरत राहिला. त्यानंतर बाबा हरिदास ठाणे या ठिकाणी असलेल्या एका ढाब्यात निक्कीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. साहिलने त्यानंतर विकृतपणाचा कळस गाठला. निक्कीच्या हत्येला काही तास उलटून गेल्यानंतर लगेचच या नराधमाने दुसऱ्या एका तरुणीसोबत लग्नही केले. या तरुणीला साहिलच्या कुटुंबीयांनी आधीच पसंत केले होते. हत्येच्याच दिवशी या भामट्याने दुसरं लग्न केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना साहिल आणि निक्की हे एकमेकांना पहिल्यांदा भेटले. त्यानंतर साहिल आणि निक्की दिल्लीतील द्वारका परिसरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला लागले. मात्र, या नात्याबद्दल साहिलने आपल्या कुटुंबियांनी काहीच माहिती दिली नव्हती. साहिलने निक्कीसोबत असलेले आपले नाते कुटुंबियांपासून लपवून ठेवले होते. त्यामुळे त्यांनी साहिलचं दुसऱ्या तरुणीबरोबर लग्न जमवलं होतं. साहिल दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करत असल्याचे निक्कीला समजल्यावर तिने त्याला काश्मीरी गेटजवळ भेटण्यासाठी बोलवलं. यावेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी रागात साहिलने आपल्या गाडीतील मोबाईल फोनच्या केबलच्या मदतीने निक्कीचा गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी साहिलला अटक केली.

हे सुद्धा वाचा

VIDEO : मुंबई बुडणार…! संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचा इशारा

भाजपने आधी महाराष्ट्रातील उद्योग पळवले, आता ज्योतिर्लिंगही…

PHOTO : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी घेतली दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंची भेट

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी