30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeक्राईमऍनिडेस्कची लिंक ओपन केली, वयोवृद्ध व्यक्तीचे बँक खातेच झाले रिकामे; पोलिसांनी तिघांच्या...

ऍनिडेस्कची लिंक ओपन केली, वयोवृद्ध व्यक्तीचे बँक खातेच झाले रिकामे; पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या

झारखंड राज्यातील जमतारा जिल्हा हा सायबर क्राईमचा हब म्हणून ओळखला जातो. जमताराच्या आरोपीनी मुंबईतील एका वृध्दाच्या खात्यातून एक लाख 80 हजार रुपये सायबर चोरी केली होती. या प्रकरणात तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे. वृद्धाने ऍनिडेस्कची लिंक ओपन करताच सायबर चोराने त्या द्वारे वृद्धांच्या सर्व बँक खात्यांची माहिती मिळवत त्याचे बँक खाते रिकामे केले.

जमतारा हा सायबर क्राइम करणाऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथले सायबर चोर सतत सक्रिय असतात. त्यांनी मुंबईतील एका वृध्दाला लुटलं आहे. हा वृद्ध तक्रारदार कांदिवली येथे राहतो. त्याच्या व्हिसा कुरिअर ने येणार होता. यामुळे कुरियर कंपनीला फोन करू इच्छित होते. त्यांनी गूगल वर फोन नंबर शोधला पण तो फोन लागला नाही. मात्र, त्याच रात्री त्यांना फोन आला. समोरच्या व्यक्तीने तुम्हाला जर कुरियर पाहिजे असेल तर येणीडेस्क ऍप डाउनलोड करा. यानंतर समोरच्या व्यक्तीने त्यांना लिंक पाठवली आणि ती डाउनलोड करायला सांगितली.

वृद्धाने ऍनिडेस्कची लिंक ओपन करताच सायबर चोराने त्या द्वारे वृद्धांच्या सर्व बँक खात्यांची माहिती मिळवली. एवढंच नव्हे तर त्यांच्या बँक खात्यातून 1 लाख 80 हजार रुपये लंपास केले. वृध्दाला हे कळू नये म्हणून तुम्हाला कुरियर पाहिजेअसल्यास दोन रुपये गुगल पे करा अस सांगितलं. वृद्ध व्यवहार करण्यात व्यस्त असताना सायबर चोरांने आपला डाव साधला होता. थोड्या वेळा नंतर हे सर्व आपण लुटलो गेलो आहे हे वृद्धांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कांदिवली पोलीस स्टेशन येथे जाऊन गुन्हा दाखल केला.

याबाबत पोलिसानी तपास सुरू केला.यावेळी फोन नंबर जमतारा येथील असल्याचं उघडकीस आलं. मात्र, फोन बंद होता. पुढील तपासात सायबर चोर हा आणखी चार फोन वापरत असल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी सतत त्यांच्या वर पाळत ठेवली. या गुन्हात गुलझार अन्सारी, सरफन अन्सारी आणि सईद अन्सारी हे असल्याचं उघडकीस आलं. सायबर चोरांनी वृद्धांच्या खात्यातील रक्कम दिल्ली आणि कोलकाता येथील दोन खात्यावर वळती केली होती.

हे सुद्धा वाचा

आमदार अपात्रता सुप्रीम कोर्टाने पुन्हा अध्यक्षांकडे पाठविल्यास निर्णय कोण घेणार? नार्वेकर की झिरवाळ?

उद्धव ठाकरेंनी पवारांवर बोलणे टाळले, मोदींवर साधला निशाना

फ्लॅट धारकांची फसवणूक निर्मल लाईफ स्टाईलच्या बिल्डराना जामीन नाकारला

पोलिसांनी आरोपीवर सतत पाळत ठेवली होती. कांदिवली पोलीस दोन वेळा जमतारा येथे जाऊन आलेत. मात्र, दोन्ही वेळा आरोपी फरार झाले होते.मात्र, तिसऱ्यादा पोलिसांनी गाठलंच. गुलझार अन्सारी, सरफन अन्सारी आणि सईद अन्सारी या तिघांना अटक करून मुंबईत आणलं आहे. यावेळी आरोपी कडून 11 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.हे सायबर चोर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत सायबर चोरी करायचे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी