26 C
Mumbai
Friday, March 17, 2023
घरक्राईमअखेर ९ वर्षांनंतर आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा

अखेर ९ वर्षांनंतर आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा

स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम बापू (Asaram Bapu) यांना 2013 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मंगळवारी गांधीनगर सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या गॉडमनच्या माजी शिष्याने नऊ वर्षांहून अधिक काळ गुन्हा दाखल केला होता. मात्र, पुराव्याअभावी सत्र न्यायालयाने आसारामची पत्नी लक्ष्मीबेन, त्यांची मुलगी आणि चार शिष्यांसह अन्य सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली ज्यांना गुन्ह्यात मदत आणि प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. अखेर नऊ वर्षानंतर 81 वर्षीय धर्मगुरू जोधपूर तुरुंगात आता जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. (Asaram Bapu was sentenced to life imprisonment after 9 years)

चांदखेडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, या स्वयंभू धर्मगुरूने 2001 पासून अनेक वेळा सुरत येथील महिला शिष्यावर बलात्कार केला होता. 2006मध्ये पळून जाण्यापूर्वी ती पीडित अहमदाबादजवळील मोटेरा येथील त्याच्या आश्रमात राहत होती. आश्रमात राहत असताना 2001 ते 2006 या काळात महिलेवर अनेकदा बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या खटल्यातील विशेष सरकारी वकील आर. सी. कोडेकर यांनी सोमवारी सांगितले की, न्यायालयाने आसारामला कलम 376 2(सी) (बलात्कार), 377 (अनैसर्गिक लैंगिक गुन्हे) आणि भारतीय दंड संहितेच्या इतर तरतुदींनुसार बेकायदेशीर नजरकैदेत ठेवल्याबद्दल दोषी ठरवले आहे.

हे सुद्धा वाचा : गुंगीचे औषध देऊन 120 महिलांवर बलात्कार करणाऱ्या तांत्रिक जिलेबी बाबाला 14 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा

पळपुटया बागेश्वरच्या डोक्यावर परिणाम; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची निंदा नालस्ती

‘त्या’ २५ बलात्काऱ्यांची नावं गर्भारपणात पोटावर लिहून विवस्त्र फिरत होती…

आसाराम सध्या जोधपूर तुरुंगात आहेत. 2018 मध्ये जोधपूर येथील एका ट्रायल कोर्टाने आसारामला एका वेगळ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. आसारामला त्याच्या जोधपूरच्या आश्रमात 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. आसाराम आणि इतर सात जणांवर ऑक्टोबर 2013 मध्ये सुरतच्या एका महिलेने बलात्कार आणि बेकायदेशीर कैदेत ठेवल्याचा आरोप केला होता. जुलै 2014 मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

आसाराम जमिनीच्या वादातही अडकले आहेत. रतलाम येथील सुमारे 100 एकर जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण 2001 चे आहे, जेव्हा आसारामच्या योग वेदांत समितीने 11 दिवसांसाठी मंगलय मंदिराजवळ जमीन घेतली होती. मात्र 11 दिवस उलटूनही जमीन मोकळी झाली नाही. या जमीन प्रकरणात आसाराम, त्यांचा मुलगा नारायण साई आणि इतर काही जणांना आरोपी करण्यात आले होते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी