28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeक्राईमसंतापजनक! परीक्षेवेळी विद्यार्थीनींना काढायला लावले अंतर्वस्त्र, पाच महिला अटकेत

संतापजनक! परीक्षेवेळी विद्यार्थीनींना काढायला लावले अंतर्वस्त्र, पाच महिला अटकेत

टीम लय भारी

केरळ (कोल्लम) : केरळमध्ये विद्यार्थीनींना परीक्षेआधी सक्तीने अंतर्वस्त्र काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर समाजमाध्यमांतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून संबंधित पाच महिलांना अटक करण्यात आली आहे.

केरळमधील कोल्लम जिल्ह्यात आयूर येथे नीट परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे. परीक्षा केंद्रात परीक्षेआधी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत होती. तपासणीवेळी काही विद्यार्थीनींंच्या अंतर्वस्त्रातील हुकमुळे मेटल डिटेक्टरमध्ये आवाज येऊ लागला. आवाज वारंवार येऊ लागल्यामुळे तपासणी करणाऱ्यांनी त्यावेळी चक्क विद्यार्थीनींना सक्तीने अंतर्वस्त्र काढून ठेवण्यास सांगितले. अंतर्वस्त्रांसह परीक्षेला बसू दिले जाणार नाही असेही त्यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान या प्रकरणी पीडीत विद्यार्थीनींच्या पालकांनी पोलिस स्थानकांत धाव घेतली आणि याबाबत तक्रार नोंंदवली. या तक्रारी नंतर अखेर मंगळवारी या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले.

यावर आता परीक्षा केंद्रावरील अधिक्षक यांनी मौन सोडत विद्यार्थीनींनी केलेला आरोप चुकीचा आहे. विद्यार्थीनींना अंतर्वस्त्र काढण्यास सांगितले नव्हते असे म्हणून आरोप झटकून टाकले आहेत, तर यावर NTA ने याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

केरळ मध्ये घडलेला हा प्रकार धक्कादायक असून याविषयीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांमध्ये हा सध्या चर्चेचा विषय ठरत असून घडलेल्या प्रसंगावर नेटकरी प्रचंड टीका करीत आहेत.

हे सुद्धा वाचा…

हिंदुत्वावर खेळी खेळणाऱ्या शिंदे गटाला आदित्य ठाकरेंनी फटकारले

प्राध्यापक नरकेंनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारण सोडणार ?

विदर्भात शिंदे गट शिवसेना फोडणार? ‘मिशन विदर्भ’ लवकरच सुरू

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी