34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्राईमसचिन वाझेला जामीन मंजूर; पण मुक्काम तुरूंगातच

सचिन वाझेला जामीन मंजूर; पण मुक्काम तुरूंगातच

मनी लॉन्ड्रीग प्रकरणी तुरूंगात असलेल्या बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर

मनी लॉन्ड्रीग प्रकरणी तुरूंगात असलेल्या बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सचिन वाझेने सीआरपीसी कलम 88 अंतर्गत मुंबई सत्र न्यायालयात जामीनाचा अर्ज दाखल केला होता. सचिन वाझेला जामीन मिळाला असला तरी इतर प्रकरणांमध्ये तो सध्या तुरूंगात आहे. त्यामुळे सचिन वाझेचा मुक्काम सध्यातरी तुरुंगातच राहणार आहे. जामीन दिल्यास वाझे पुराव्यांशी छेडछाड करु शकतो असे म्हणत ईडीने सचिन वाझेच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. मात्र न्यायालयानकडून वाझेला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सचिन वाझेला माफीचा साक्षीदार
मनी लॉण्ड्रिग प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझे याला कथित भ्रष्टाचार (महाविकास आघाडी सरकारच्या १०० कोटींच्या वसुली) या प्रकरणात माफीचा साक्षीदार करण्यात आलं आहे. याच कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेनी दाखवली आहे.

अंबानीच्या बंगल्याबाहेरील स्फोटक आणि मनसुखच्या हत्येप्रकरणी वाझे आरोपी
एनआयएकडून मुकेश अंबानींच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या आणि तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेन याच्या अचानक झालेल्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, सोबतच त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला प्रथम अटक करण्यात आली होती. तर दुसरीकडे ईडीने लगेच सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या काही दिवसांनी सीबीआयने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती. या सर्वाच्या तपासादरम्यान मी अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केले होते असे सचिन वाझेने सांगितलं होतं.

हे सुद्धा वाचा

Aditya Thackeray : मुंबईत चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणाच्या आदेशाने? आदित्य ठाकरेंचा सवाल

Raju Shetti : एक रकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीचे ऊस तोड बंद आंदोलन

KEM Hospital: केईएम हॉस्पिटल मधील नर्सेस आक्रमक; रुग्णालय प्रशासनविरोधात आंदोलन

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी सचिन वाझे सध्या अटकेत आहे. तसेच या बरोबर भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि ख्वाजा युनुस कथिक कोठडी मृत्यू प्रकरणातही वाझे सध्या आरोपी आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी