25 C
Mumbai
Friday, March 17, 2023
घरक्राईमबालाजी ऑईल मिलच्या मालकाकडून 8 लाखांची खंडणी उकळणाऱ्या न्यूज 24च्या पत्रकारासह 8...

बालाजी ऑईल मिलच्या मालकाकडून 8 लाखांची खंडणी उकळणाऱ्या न्यूज 24च्या पत्रकारासह 8 जण पोलिसांच्या ताब्यात

बालाजी उद्योग समूहाच्या काबरा परिवाराकडून खंडणी वसुलीची माहिती शहरात पसरताच विविध चर्चांना उधाण आले. यापूर्वी काबरा परिवाराने या खंडणीखोरांना 70 हजार रुपये कोणत्या भीतीपोटी दिले असावेत, याबाबतही शहरात कुतूहल आहे. तेव्हाच या परिवाराने पोलिसांकडे तक्रार का केली नाही? बालाजी ऑईल मिलच्या कुठल्या भानगडी या लोकांकडे असाव्यात, याची चर्चा सुरू आहे. या खंडणी बहाद्दर टोळीने यापूर्वी बालाजी ऑईल मिल व्यतिरिक्त राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एका व्यक्तीलाही अशा प्रकारे धमकी देऊन खंडणीची मागणी केल्याबाबतही शहरात चर्चा आहे.

बालाजी ऑईल मिल या प्रसिद्ध शेंगदाणा तेल उत्पादक व इतर तेलबिया प्रोसेसिंग कंपनीच्या मालकाकडून 8 लाखांची खंडणी उकळताना पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतले आहे. (Balaji Oil Mill Owner Kabra Ransom News 24 Journalist Arrested) यात न्यूज 24 वृत्तवाहिनीचा पत्रकार, दोन अल्पवयीन मुली व एका महिलेसह 8 जणांचा समावेश आहे. दरम्यान, बालाजी ऑईल मिलच्या मालकाने यापूर्वीही न्यूज 24 वाहिनीच्या संबंधित पत्रकाराला मिलविरोधातील तक्रारी चव्हाट्यावर येऊ नये, यासाठी 70 हजारांची खंडणी दिल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील हे प्रकरण आहे. एरंडोल शहरातील म्हसावद रोडवर गेली अनेक वर्षे बालाजी ऑईल मिल हा उद्योग आहे. अलीकडील काही वर्षांत विविध क्षेत्रात या उद्योगाचा झपाट्याने विस्तार झाला आहे. बालाजी मिलचे शेंगदाणा तेल जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र, पुणे-मुंबईतीही प्रसिद्ध आहे. अर्थात, मिलच्या कारभाराबाबत, प्रदूषण, कामगार नियमांची पायमल्ली याबाबत सातत्याने तक्रारी होत असतात. त्यातूनच बालाजी ऑईल मिलच्या काबरा परिवाराने न्यूज 24 पत्रकाराला यापूर्वीही 70 हजारांची खंडणी दिल्याची बाब उघड झाली आहे. मिलसंदर्भातील गैरप्रकारांच्या तक्रारी चव्हाट्यावर येऊ नये म्हणून काबरा यांनी एकदा खंडणी दिल्यामुळे चटावलेल्या खंडणीखोरांनी यावेळी त्यांच्याकडे आठ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

मिलमधील गैरप्रकारांच्या तक्रारी दाबाण्यासाठी गेल्यावेळी 70 हजार रुपये खडणी देणाऱ्या बालाजी ऑईल मिलच्या काबरा परिवाराकडे काही दिवसांपूर्वी पुन्हा मोठ्या खंडणीची मागणी करण्यात आली. काबरा परिवारातील उद्योजक अनिल गणपती काबरा हे म्हसावद रस्त्यावरील आपल्या बालाजी ऑइल मिलवर असताना एक महिला व एका पुरुषाने ही खंडणी मागितली. आठ लाखांची खंडणी न दिल्यास ऑईल मिलबाबत शासकीय कार्यालयाकडे तक्रार करण्याचा दम भरला गेला. उद्योजक अनिल काबरा यांनी खंडणीची धमकी आल्यानंतर एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एरंडोल पोलिसांनी केला सिनेस्टाईल पाठलाग

खंडणीची मागणी करणारे खंडणीची रक्कम घेण्यासाठी सोमवारी, 16 जानेवारी रोजी बालाजी ऑईल मिल येथे येणार होते. काबरा यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता. दोन महिला व दोन पुरुष हे खंडणीची रक्कम घेण्यासाठी बालाजी ऑईल मिलमध्ये आले. एक महिला व तीन पुरुष मिलच्या बाहेर उभे राहिले होते. मिलमध्ये आलेल्या खंडणीखोरांपैकी एका महिलेने उद्योजक अनिल काबरा यांच्याकडून खंडणीपोटी एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच पोलीस पथकाने महिलेसह तिच्या साथीदारांना पकडले. घटनेची चाहूल लागताच मिलबाहेर असलेल्या एक महिला व तीन पुरुष अशा चारही जणांनी दोन मोटार सायकलवरून जळगावच्या दिशेने धूम ठोकली. एरंडोल पोलिसांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून महामार्ग पोलीस व पाळधी पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले. एकूणात, बालाजी ऑइल मिलचे संचालक अनिल गणपती काबरा यांना धमकावून आठ लाखांची खंडणी उकळताना एरंडोल पोलिसांनी आठ संशयिताना सापळा रचून खंडणी अटक केली. या संशयितांत पाच पुरुष, एक महिला व दोन मुलींचा समावेश आहे.

हे सुध्दा वाचा : 

 पुणे शहरात सेक्स्टॉर्शन; वाढले! पोलिस आयुक्तांचे नागरिकांना सावधानतेचे आवाहन

शिंदे सरकारच्या काळात निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचे फावले; पुन्हा सेवेत रुजू

परमबीर सिंग सुद्धा खंडणीखोरांचे प्रमुख !

सर्व खंडणीखोरांना ताब्यात घेवून एरंडोल पोलिस ठाण्यात नेले गेले. पोलीस तपासात, ताब्यात घेतलेल्या दोघा मुलींच्या वयाबाबत सांशकता आहे. उर्वरित सहा आरोपींची नावे अशी – शशिकांत कैलास सोनवणे (रा. द्वारकानगर, भुसावळ), सिद्धार्थ सुनील सोनवणे (ताप्ती क्लब, भुसावळ), मिलिंद प्रकाश बोदडे (तळणी, ता.मोताळा, जि.बुलढाणा) आकाश सुरेश बोदडे (तळणी), गजानन आनंदा बोदडे (रा.धम्मनगर, भुसावळ), रुपाली राजू तायडे (धम्मनगर, भुसावळ). यातील मिलिंद बोदडे हा न्यूज 24 वृत्तवाहिनीचा पत्रकार आहे. संशयितांमध्ये दोघा मुलींच्या वयाबाबत साशंकता असल्यामुळे पोलिसांनी त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली.

न्यूज 24 चा पत्रकार मिलिंद बोदडे याने यापूर्वी देखील विविध शासकीय कार्यालयात वेगवेगळ्या नावाने बालाजी ऑईल मिल विरोधात तक्रारी करून अनिल काबरा यांचेकडून सुमारे 70 हजार रुपये खंडणी उकळली आहे. सोमवारी सापळा रचून एक लाख रुपये स्वीकारताना पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयितांकडून एक लाख रुपये रोख, एक डिझायर कार आठ मोबाईल, दोन मोटारसायकल असा 10 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, बालाजी उद्योग समूहाच्या काबरा परिवाराकडून खंडणी वसुलीची माहिती शहरात पसरताच विविध चर्चांना उधाण आले. यापूर्वी काबरा परिवाराने या खंडणीखोरांना 70 हजार रुपये कोणत्या भीतीपोटी दिले असावेत, याबाबतही शहरात कुतूहल आहे. तेव्हाच या परिवाराने पोलिसांकडे तक्रार का केली नाही? बालाजी ऑईल मिलच्या कुठल्या भानगडी या लोकांकडे असाव्यात, याची चर्चा सुरू आहे. या खंडणी बहाद्दर टोळीने यापूर्वी बालाजी ऑईल मिल व्यतिरिक्त राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एका व्यक्तीलाही अशा प्रकारे धमकी देऊन खंडणीची मागणी केल्याबाबतही शहरात चर्चा आहे.

एरंडोल पोलिसांच्या आजच्या सापळ्यात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार अनिल पाटील,मिलिंद कुमावत,संदीप पाटील,जुबेर खाटिक, महिला पोलीस ममता तडवी, होमगार्ड दिनेश पाटील यांच्यासह पंचांचा समावेश होता.

Balaji Oil Mill Owner Kabra Ransom, News 24 Journalist Arrested, Erandol Police, बालाजी ऑईल मिल एरंडोल, न्यूज 24 पत्रकार

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी