33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeक्राईमबाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये तुंबळ हाणामारी; वाद चव्हाट्यावर

बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये तुंबळ हाणामारी; वाद चव्हाट्यावर

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील बाळूमामा देवस्थान ट्रस्टचा गैरकारभार आणि ट्रस्टी नेमणुकीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाचा परिणाम आज कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील फ्री स्टाइल हाणामारीमध्ये पाहायला मिळाला. वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली आहे.

राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये सोमवारी येथील धर्मादाय उपायुक्त कार्यालयासमोर फ्री स्टाइल हाणामारी झाली. गावचे सरपंच विजय गुरव यांना यावेळी धक्काबुक्की झाल्याने तणाव निर्माण झाला; परंतु याप्रकरणी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. देवस्थानचे कार्याध्यक्ष असलेले राजाराम मगदूम यांचे निधन झाल्यामुळे नवीन कार्याध्यक्ष निवड करण्यावरून मतप्रवाह निर्माण झाल्याने ट्रस्टीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. धर्मादाय कार्यालयाजवळ दोन्ही गटांत हाणामारी झाल्याने हा वाद अधिकच चिघळला आहे.

ट्रस्टी नेमणूक आणि मंदिरामध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराविरोधात आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात त्यांच्या वकिलांना भेटायला आले असता त्यांच्या विरोधातील मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी देवस्थान ट्रस्टचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले त्याचे समर्थक आणि सरपंच विजय गुरव यांच्यामध्ये जोरदार हाणामारी पाहायला मिळाली.

Dispute In Balumama Devasthan Committee Directly On The Streets Courageous Bhosle Supporters Beat Up Sarpanch | Kolhapur News : बाळूमामा देवस्थान समितीमधील वाद थेट रस्त्यावर, धैर्यशील भोसले ...

सरपंच विजय गुरव यांना मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले याच्या समर्थकांनी जोरावर मारहाण केली. भोसले गटाच्या समर्थकांनी सरपंच गुरव हे गावचं आणि ट्रस्टचं नाव बदनाम करत असल्याचा आरोप केलाय. तर देवस्थान समितीच्या ट्रस्टचा कारभार चुकीच्या पद्धतीने करून बेकायदेशीरपणे ट्रस्टीची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर कार्याध्यक्षांची नेमणूकही बेकायदेशीर झाली आहे, असा गंभीर आरोप सरपंच विजय गुरव यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा : 

नाशिकच्या काळा राम मंदिरात संयोगीताराजेंना वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव!

लोकांनी तक्रार केली म्हणून गझनीने सोमनाथ मंदिर तोडले

मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी!

ग्रामपंचायत VS ट्रस्टी वाद सुरूच!
सन 2003 नंतर खऱ्या अर्थाने बाळूमामा मंदिराकडे भक्तांचा ओढा वाढला. उत्पन्नातही प्रचंड वाढ झाली, तशा अनेकांच्या नजरा या मंदिर ट्रस्टीमध्ये घुसण्यासाठी लागल्या. त्यातूनच ग्रामपंचायत व ट्रस्टी असाही वाद सुरू झाला. गावातील राजकीय नेते मंडळी आणि ग्रामपंचायत ट्रस्टी यांच्यात वादविवाद झाले. मध्यंतरीच्या काळात पोलिस तक्रारी झाल्या आणि मारहाणीचे गुन्हेसुद्धा दाखल झाले.

संत बाळूमामा भक्तांची तीव्र नाराजी
संत बाळूमामा संस्थान हे मागील काही वर्षापासून फारच चर्चेत आलं आहे. एका टीव्ही वाहिनीवर बाळूमामांवरील मालिका सुरू झाल्यापासून या भागात भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. तसंच राज्यभरात बाळूमामांची महती पोहचल्याने त्यांच्या भक्तगणांमध्येही वाढ झाली आहे. एकीकडे संस्थानाचा लौकिक वाढत असताना दुसरीकडे विश्वस्त मंडळातील लोकांची थेट रस्त्यावर हाणामारी झाल्याने या संस्थानाच्या कारभाराला आता गालबोट लागलं आहे. तसंच याबाबत अनेक भक्तगणांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 

Balumama Devasthan Trust Disputes, Balumama Devasthan, Sadguru Shri Sant Balumama Temple Bhudargad

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी