30 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरक्राईमकेवायसी फ्रॉड पासून सावध रहा; सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

केवायसी फ्रॉड पासून सावध रहा; सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना फोन करुन त्यांना केवायसी बाबत चौकशी केली जात आहे. तसेच नसल्याने तुमचे बँक खाते बंद करण्यात येत आहे, असे एसएमएस पाठवले जात आहेत. केवायसीच्या नावाखाली नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक सुरु आहे. या पार्श्वभूमिवर मुंबई पलिसांनी केवायसी फ्रॅाडबाबात सावध राहण्याचे आवाहन केले आहे. (Beware of KYC Fraud; Cyber police appeal to citizens)

सायबर गुन्हेगार नागरिकांना फोन करुन तुम्हाला तुमचे खाते सुरु ठेवायच असल्यास खाली दिलेल्या लिंकवर माहिती द्या असे सांगितात. नागरिक खात बंद होऊ नये म्हणून सायबर गुन्हेगारांना पाठवलेल्या लिंक वर माहिती भरतात. तस केल्यावर नागरिकांच्या बँकेची सर्व माहिती गुन्हेगार घेतात आणि मत त्यांच्या बॅँक खात्यातून रक्कम ढापतात. गेल्या दिवसांत अशा फ्रॉ़डचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध रहावे, नागरिकांना बँकेत काही काम असल्यास त्यांनी स्वत: बँकेत जाऊन ते कराव, असs आवाहन सायबर विभगाचे पोलीस उपायुकत डॉ. बाळसिंग राजपुत यांनी केल आहे.

हे सुद्धा वाचा 

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या अन्य दोघांचा शोध सुरू

शरद पवार म्हणाले, देशात बदलाचे वातावरण निर्माण होतयं

संदीप देशपांडे हल्ला प्रकरण : महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेच्या उपाध्यक्षाला अटक

या गोष्टींकडे लक्ष द्या

अनोळखी नंबरवरुन आलेल्या लिंकला प्रतिसाद देवू नका. 

बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 

केवायसी बँकेत जाउन पूर्ण करा. 

केवायसी अपडेट संबधी येणाऱ्या एसएमसचा प्रतिसाद देवू नका. 

कार्ड तपशिल, पिन नंबर, ओटीपी, पासवर्ड बँकेचे अधिकारी कधी मागत नाहीत.

सार्वजनिक वायरलेस वापरायचे टाळा. 

लिंकवर क्लिक करम्यापूर्वी विचार करा, अस आवाहन करण्यात आल आहे. 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी