32 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरक्राईमभाजप पदाधिकाऱ्याला तलवारीने मारहाण; आरोपींवर कडक कारवाईची आमदार प्रवीण दरेकरांची मागणी

भाजप पदाधिकाऱ्याला तलवारीने मारहाण; आरोपींवर कडक कारवाईची आमदार प्रवीण दरेकरांची मागणी

दहिसरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप (BJP) मध्ये प्रवेश केला आहे. याचा राग धरून त्यांच्या त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आला आहे. विरोधकांनी भाजप पदाधिकारी विभीषण वारे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात विभीषण वारे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वारे यांच्या पाठीला, खांद्याला आणि छातीला दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

दहिसर येथे भाजपचे कार्यकर्ते बिभीषण वारे यांच्यावर 50 जनांनी प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे. हा मुद्दा आज विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडला. यावेळी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

दहिसर येथे विभीषण वारे हे राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. याचा राग धरून त्यांच्या त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आला आहे. सुमारे 50 ते 52 लोकांनी तलवारीने हल्ला केला. त्यात वारे यांच्या अंगावर अनेक वार झालेत. वारे यांच्यावर हल्ला झाल्यावर त्यांना बोरिवली च्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी नेण्यात आले. मात्र , तिथल्या डॉक्टर यांनी त्यांना ऍडमिट करून घेतलं नाही. नॉर्मल जखमा असल्याचं सांगून त्यांना परत पाठवण्यात आलं, अस आमदार दरेकर यांनी संगीतलं.

आपण पोलिसांशी बोललो. त्यांनी आधी 307 कलम लावलं नव्हतं. मी त्यांच्याशी बोलल्यानंतर 307 कलम लावण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणात काही जणांना अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्या मोक्का कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी.आरोपी कोणत्या गटाचे आहेत हे महत्त्वाचं नाही तर ती एक हल्ला करणारी प्रवृत्ती आहे. त्यांना अटक करून या हल्या मागचा सूत्रधार ही पोलिसांनी शोधून काढायला हवा. तसे आदेश सरकार ला द्या , अशी मागणी ही दरेकर यांनी सभापती डॉ नीलम गोरे यांच्याकडे केली.त्याची दखल घेऊन डॉ. गोरे यांनी याबाबत सम्बधित मंत्र्यांना निवेदन करायचे आदेश दिलेत.

हे सुद्धा वाचा :

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या अन्य दोघांचा शोध सुरू

उद्धव ठाकरे गटातील आमदाराचा सोनू निगमवर हल्ला

महाविकास आघाडीमुळेच विजेचा खेळखंडोबा सुरु आहे : प्रवीण दरेकर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी