29 C
Mumbai
Thursday, May 18, 2023
घरक्राईमपुण्यात दहशतवादी कृत्यांना वेग? दुसऱ्यांदा बाॅम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

पुण्यात दहशतवादी कृत्यांना वेग? दुसऱ्यांदा बाॅम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

टीम लय भारी

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा बाॅम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने पुणेकरांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. सदर वस्तू हवेली तालुक्यात आढळून आली असून ताबडतोब बॉम्बशोध पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान यंदाच्या वर्षात घडलेली ही दुसरी घटना असून पुण्यात दहशतवादी कृत्यांना वेग येतोय का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या उजव्या बाजूस बॉम्ब सदृश वस्तू असल्याचे अभिमान रोहिदास गायकवाड यांना लक्षात आले, त्यामुळे त्यांनी त्वरीत पोलीस पाटील अंकुश उंद्रे व अशोक आव्हाळे यांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पी आय गजानन पवार यांना संपर्क करण्यात आला.

दरम्यान, पोलीस पथक व बाॅब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी पोलिसांकडून आणखी तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खूप वर्षांपूर्वीचा जुना ग्रेनेड परिसरात आढळून आलेला आहे. साधारण 7,8 वर्षांपूर्वी त्या ठिकाणी भराव टाकण्यात आला होता, परंतु पावसामुळे ते आता वर आलेले दिसत आहे. या बाॅम्बसदृश्य वस्तूमुळे परिसरात भीतीचे वातावरण दिसून येत आहे.

काही महिन्यांपूर्वी पुणे स्टेशन येथे जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने सुद्धा खळबळ उडाली होती, परंतु पुणे पोलिस आणि बाॅम्ब शोधक पथक यांनी संपुर्ण स्टेशन रिकामे करून पाहणी केली होती, आणि कोणताच धोका नाही म्हणून पुणेकरांना आश्वस्थ केले होते, परंतु आज पुन्हा बाॅम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने पुण्यात दहशतवादाचे सावट येऊ लागले आहे का असा सवाल डोकं वर काढू लागला आहे.

हे सुद्धा वाचा…

प्रियकराने पळवून नेलेल्या 15 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू

सीएसएमटी स्थानकातून पनवेलला जाणारी ट्रेन बफरला धडकली

‘त्यांचे केवळ राजकारणासाठी हिंदुत्व…!’ शिवसेनाप्रमुख ठाकरेंचा शिंदेगटावर थेट आरोप

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी