32 C
Mumbai
Tuesday, May 16, 2023
घरक्राईमखलिस्तानवाद्यांना अर्थपुरवठा केल्याप्रकरणी मुंबईतील व्यापारी एनआयएच्या जाळ्यात

खलिस्तानवाद्यांना अर्थपुरवठा केल्याप्रकरणी मुंबईतील व्यापारी एनआयएच्या जाळ्यात

‘नॅशनल इव्हेस्टिगेशन एजन्सी’ अर्थात एनआयएचे सध्या देशपातळीवर धाड सत्र सुरू आहे. यावेळी मुख्य मुद्दा खलिस्तानवादी दशतवादी आणि हवाला ऑपरेटर हे आहेत. एनआयएने गेल्या तीन दिवसांत ७६ ठिकाणी छापेमारी करून अनेक हत्यारे, कोट्यवधींची रोकड यासहित सहा जणांना अटक केली आहे. खलिस्तानवादी चळवळ कशी फोफावतेय आणि या खलिस्तानवाद्यांना हवालामार्फत पैसा कसा पुरविण्यात येतो याचा खुलासा एनआयएने केला आहे. एनआयएचे गेल्या तीन दिवसांपासून धाडसत्र सुरू आहे. देशभरात ७६ ठिकाणी हे धाडसत्र सुरू आहे. या धाडी रडारवरील संशयित, इमिटेश ज्वेलरीची आयात निर्यात करणारे व्यापारी आणि एजंट, हवाला ऑपरेटर यांच्या विरोधात सुरू आहेत. (Businessman arrested from Mumbai for providing money to Khalistan terrorist) खलिस्तानवाद्यांना हवालामार्गे पैसे पुरवण्याच्या संशयावरून आग्रीपाडा येथून एका व्यापाऱ्याला एनआयएने ताब्यात घेतले आहे.

एनआयएच्या चंदीगड युनिटच्या रडारवर मुंबईतील काही निर्यातदार आणि व्यापारी होते. चंदीगडची टीम मुंबईत दाखल झाली आणि त्यांनी आग्रीपाडा येथील एका उचभ्रु इमारतीत धाड टाकून एका व्यक्तीला ताब्यात घेतले. संबंधित व्यक्तीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. एनआयएच्या रडारवर या व्यक्तीचे वडील होते. पण काही महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. आरोपीचे वडील बनावट दागिन्यांचे मोठे व्यापारी होते. त्याच्या नंतर आता त्याचा मुलगा व्यवसाय सांभाळत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्या मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केले आहे. मुंबईत आणि देशात अनेक टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्या मोठमोठ्या खंडण्या उकळत आहेत. या खंडणीचा पैसा हवालामार्फत चीन, पाकिस्तान, फिलिपाईन्स, कॅनडा, लंडन आदी देशांत म्होरक्यांमार्फत लोकांकडे पाठवला जातो. हा पैसा हवालामार्फत पाठवला जात असल्याचा संशय एनआयएच्या अधिकाऱ्यांना आहे.

जगभरात खलिस्तानवादी सक्रिय आहेत. त्यांचं हवालाच मोठं रॅकेट आहे. ताब्यात घेण्यात आलेले संशयित हे हवालाशी संबंधित आहेत. खलिस्तानी दहशतवादी आणि बिष्णोई सिंडिकेट यांच्यात घनिष्ठ संबंध आहेत. या प्रकरणी एनआयएने महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या करवाईतून खलिस्तानवादी चळवळ कशी वाढतेय आणि त्यांना कशा प्रकारे हवालामार्फत पैशांचा पुरवठा करण्यात येतो याचा उलगडा एनआयएच्या तपासात झाला आहे.

हे सुद्धा वाचा

VEDIO : कोर्लईतील १९ बंगल्याचा घोटाळा ; ग्रामसेवक, सरपंचावर गुन्हा दाखल

विषारी हवेने घेतला १३,४४४ मुंबईकरांचा बळी

ईडीचा गुन्हा रद्द करावा यासाठी छगन भुजबळ यांची याचिका

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी