27 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरक्राईमबलात्काराचा खोटा गुन्हा, सीएने केली आत्महत्या

बलात्काराचा खोटा गुन्हा, सीएने केली आत्महत्या

इगतपुरी येथे मुलुंडमधील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट चिराग विनोदराय वरैया (वय ४५) यांनी हॉटेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली. काही दिवसांपूर्वी त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्यांची चौकशी झाली. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असतानाच त्यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. नेमक्या कुणाच्या दबावाखाली त्यांनी टोकाचे पाऊल उचलले ? याबाबत तपास सुरू आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी नोंद करत घटनास्थळावरून दोन पानी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. सुसाईट नोटमध्ये ‘बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप करत सत्य लवकरच समोर येईल,’ असे नमूद केले आहे. (CA commits suicide over fake rape case)

मुलुंडमध्ये चिराग यांची ‘चिराग वरैया आणि कंपनी’ (CVCO) आहे. १० जानेवारी रोजी त्यांच्या विरोधात भांडुप पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्यात २६ जानेवारी रोजी ते भांडुप पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. मात्र, प्रकृती ठीक नसल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले. अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत इगतपुरीला राहणार असल्याचे कुटुंबीयांना सांगून त्यांनी चालकासोबत इगतपुरी गाठली. शनिवारी ते इगतपुरी येथील मित्राच्या मानस प्रोजेक्ट हॉटेल विवांतमध्ये थांबले. पोलिसांना लोकेशन समजू नये म्हणून त्यांचा मोबाइलही घरीच ठेवला होता आणि त्यानंतर जे घडले ते धक्कादायक होते.

हे सुद्धा वाचा : धक्कादायक : पोलिस ठाण्याच्या आवारातच तरुणाने पेटवून घेतले

Gang Rape : धक्कादायक! एका पुजाऱ्याने महिलेकडून पैसे उकळत केला सामुहिक बलात्कार

गुंगीचे औषध देऊन 120 महिलांवर बलात्कार करणाऱ्या तांत्रिक जिलेबी बाबाला 14 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा

नेमकं प्रकरण काय?
शनिवारी दुपारी ३ वाजता हॉटेलवर पोहोचताच चिराग यांनी चालकाला दोन हजार रुपये देत पुढील काही दिवस डिस्टर्ब करू नको, असे सांगितले. या ठिकाणाबाबतही कुणाला माहिती देऊ नको. तसेच, सोमवारी मुंबईकडे निघायचे असल्याचे नमूद केले. त्यामुळे चालकाने या दिवसांत त्यांना कॉलही केला नाही. सोमवारी निघायचे असल्याने चालकाने चिराग यांना कॉल करण्यास सुरुवात केली. दरवाजा ठोठावला. मात्र, प्रतिसाद आला नाही. त्यांना संशय आल्याने बनावट चावीने प्रयत्न सुरू केले. मात्र, आतून लॉक असल्याने दरवाजा उघडण्यास अडचणी आल्या. अखेर, इगतपुरी पोलिसांशी संपर्क साधताच त्यांनी खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी