31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeक्राईमकेक कटींग’ जीवावर बेतलं! सपासप वार करत अल्पवयीन तरुणाची ‘हत्या’

केक कटींग’ जीवावर बेतलं! सपासप वार करत अल्पवयीन तरुणाची ‘हत्या’

मित्राच्या वाढदिवसानिमित्त चौकातील ‘केक कटिंग’ कार्यक्रमात १७ वर्षीय तरुणाने केक भरविल्याच्या वादातून दुसऱ्या मित्राच्या कानशिलात लगावली. त्याचाच राग धरुन या अल्पवयीन मित्राने साथीदारांच्या मदतीने १७ वर्षीय तरुणावर दहा वार करुन निर्घृण हत्या केली. पंचवटीतील आरटीओ ऑफिससमोरील कर्णनगर(अश्वमेघ) येथे गुरुवारी रात्री अकरा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी तिघा अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मित्राच्या वाढदिवसानिमित्त चौकातील ‘केक कटिंग’(Cake cutting) कार्यक्रमात १७ वर्षीय तरुणाने केक भरविल्याच्या वादातून दुसऱ्या मित्राच्या कानशिलात लगावली. त्याचाच राग धरुन या अल्पवयीन मित्राने साथीदारांच्या मदतीने १७ वर्षीय तरुणावर दहा वार करुन निर्घृण हत्या (death) केली. पंचवटीतील आरटीओ ऑफिससमोरील कर्णनगर(अश्वमेघ) येथे गुरुवारी रात्री अकरा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी तिघा अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेण्यात आले आहे.(Cake cutting’ is life-saving! Minor stabbed to death)

अशिष दशरथ रणमाळे(वय १७, रा. सार्वजनिक वाचनालयाजवळ, कर्णनगर) असे खूनाच्या घटनेत मृत्यू (death) झालेल्या तरुणाचे नाव आहे. केक भरविण्यातून त्यांच्यात आपापसांत वाद झाले होते. हा राग मनात असतानाच संशयित व आशिषमध्ये पुन्हा दोन दिवसांपूर्वी वाद झाले.

आशिषचेच मित्र असलेल्या संशयित मित्रांनी गुरुवारी त्याचा काटा काढण्याचे नियोजन करुन गुरुवारी रात्री कर्णनगर परिसरातील आपले सार्वजनिक वाचनालयाचा परिसर गाठला. आशिष कट्ट्यावर बसल्याचे दिसताच तिघांनी त्याच्या पोटावर सपासप वार केले. अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू (death) झाला. त्याला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, माहिती कळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, गुन्हेशोध पथकाचे सहायक निरीक्षक विलास पडोळकर व अंमलदार दाखल झाले. पोलिसांनी तपास करुन तिघा विधीसंघर्षित मुलांना ताब्यात घेतले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी