28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeक्राईमधुळ्यात मस्करीने घेतला बालकाचा जीव

धुळ्यात मस्करीने घेतला बालकाचा जीव

ANC- टायरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकाच्या गुदद्वारात दोघांनी हवा भरल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची घटना धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल सिटी पॉईंटच्या आवारात असणाऱ्या टायरच्या दुकानाजवळ घडली आहे. बालकासोबत मस्करी करणे या दोघांना चांगलेच महागात पडले आहे. या दोघांविरोधात मोहाडी पोलीस स्टेशन येथे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टायरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकाच्या (Child’s life) गुदद्वारात दोघांनी हवा भरल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची घटना धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल सिटी पॉईंटच्या आवारात असणाऱ्या टायरच्या दुकानाजवळ घडली आहे. बालकासोबत मस्करी करणे या दोघांना चांगलेच महागात पडले आहे. या दोघांविरोधात मोहाडी पोलीस स्टेशन येथे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Child’s life taken by joke in Dhule)

मोहम्मद खालिक मोहम्मद गनिब वय 14 राहणार मोहल्ला चांदपूर बिहार असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. टायर दुकानाच्या शेजारीच असणाऱ्या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या दोन मुलांनी मस्करीमध्ये त्या बालकाच्या गुदद्वारात हवा भरली. कॉम्प्रेसरने हवा भरल्याने त्याच्या अंतर्गत अवयवांना इजा झाल्याने त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. रोहित चंद्रवंशी व शिवाजी सुळे या दोघांना मोहाडी पोलीसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी