32 C
Mumbai
Monday, May 29, 2023
घरक्राईमएका वर्षाच्या शिक्षेच्या सुनावणीत 2 महिने आधीच नवज्योत सिद्धू तुरुंगातून बाहेर?

एका वर्षाच्या शिक्षेच्या सुनावणीत 2 महिने आधीच नवज्योत सिद्धू तुरुंगातून बाहेर?

काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांची 10 महिन्यांनंतर आज तुरुंगातून सुटका होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 19 मे ला रोड रेज प्रकरणी एकाचा मृत्यू झाला होता, त्यासंदर्भात सिद्धू यांना 1 वर्षाची शिक्षा सुनावली होती. आज सुटका झाल्यानंतर सिद्धू पटियाला तुरुंगाबाहेर मीडियाशी संवाद साधणार आहेत.

पतियाळा येथील सेंट्रल जेलमध्ये सिद्धू यांना ठेवण्यात आले होते. पण आता 10 महिने तुरुंगात काढल्यावर त्यांना सोडण्यात येणार आहे. 2 महिने आधीच त्यांना बाहेर येण्याची मुभा मिळाली आहे. तुरुंगातील वर्तन चांगले असल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे. पतियाळा तुरुंगाच्या बाहेर सिद्धू पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. तिथे काँग्रेसचे कार्यकर्ते हजर राहणार आहेत आणि सिद्धू यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. 1988च्या या प्रकरणात सिद्धू यांना ही शिक्षा सुनावण्यात आली होती.

एका वर्षाच्या शिक्षेच्या सुनावणीत 2 महिने आधीच नवज्योत सिद्धू तुरुंगातून बाहेर?

हे सुद्धा वाचा:

संयोगिताराजेंचा अपमान करणाऱ्या काळाराम मंदिरातील ‘त्या’ पुजाराकडून आता सारवासारव !

अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर; डिझायनर विरोधात गुन्हा दाखल

“मी भाजपात प्रवेश न केल्याने मला तिहार तुरुंगात टाकलं;” काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

नेमक प्रकरण काय?

27 डिसेंबर 1988 मध्ये सिद्धी आपले मित्र रुपिंदर संधू यांच्यासह पतियाळा येथील शेरावाले गेट येथील मार्केटमध्ये गेले होते. तेव्हा तिथे पार्किंग करताना त्यांचा 65 वर्षीय गुरनाम सिंह यांच्याशी वाद झाला. ते प्रकरण अगदी हाणामारीपर्यंत पोहोचले. तेव्हा सिद्धू यांनी गुरनाम सिंह यांना ढोपराने मारले. गुरनाम खाली पडले. मार लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांचा मृत्यू झाला.

शवविच्छेदन अहवालात हे स्पष्ट झाले की, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. पण सिद्धू आणि त्यांचे मित्र संधू यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यावर न्यायालयात खटला सुरू झाला. 1999ला हा खटलाच सत्र न्यायालयाने रद्द केला. पण खटला उच्च न्यायालयात गेल्यावर 2006ला सिद्धू यांना दोषी धरण्यात आले आणि प्रत्येकी 3 वर्षांची शिक्षा दोघांनाही ठोठावण्यात आली. शिवाय 1लाखाचा दंडही ठोठावण्यात आला. मग हा खटला सर्वोच्च न्यायालयात गेला. तिथे सिद्धू आणि संधू यांना आरोपातून मुक्त करण्यात आले पण 1 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. त्यावर मग पुनर्विचार याचिका दाखल केली गेली त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी