30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeक्राईमदापोली साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीच आरोपपत्र दाखल

दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीच आरोपपत्र दाखल

दापोली येथील साई रिसोर्ट प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब आरोपी आहेत. या गुन्ह्यात आता ईडीने आपले आरोपपत्र कोर्टात दाखल केलं आहे. यावर उद्या सुनावणी होणार आहे.

दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर साई रिसॉर्ट बांधण्यात आलं आहे. हे रिसॉर्ट उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते ऍड अनिल परब यांचं आहे. याबाबत पर्यावरण विभागाच्या तक्रारी नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या रिसॉर्ड च्या व्यवहारात मनी लॉन्ड्रीग झाल्याचं ईडीच म्हणणं आहे. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात प्रांत अधिकारी जयराम देशपांडे आणि अनिल परब यांचे मित्र सदा कदम यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणात अनिल परब यांची सुमारे चार ते पाच वेळा चौकशी करण्यात आली आहे.

या प्रकरणात सदा कदम यांना अटक केल्या नंतर अनिल परब यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, अनिल परब यांनी मुंबई हायकोर्टा त धाव घेतली. आणि पर्यावरण विभागाने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. यावर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. महत्वाचं म्हणजे या प्रकरणात अनिल परब यांना हे प्राकरण न्यायप्रविष्ट असे पर्यंत अटक करू नये,असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवार म्हणाले, अशा प्रवृत्तीला खड्यासारखे बजूला करण्याची वेळ आली आली आहे

रुपया ‘ग्लोबल’चे मिशन भंगले, मोदींनी देशाची अब्रू घालवली

कळंबोलीत ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याची डोक्यात, मानेवर वार करुन हत्या

तर दुसरीकडे साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीनं मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे.हे आरोपत्र अटक आरोपी सदा कदम आणि जयराम देशपांडे यांच्या विरोधात दाखल केलं आहे.महत्वाचं म्हणजे या आरोपपत्रात अनिल परब यांनाही आरोपी दाखवण्यात आलं आहे. मात्र, अनिल परब यांना हायकोर्टाच संरक्षण असल्याने ईडी त्यांना अटक करू शकत नाही. विशेष पीएमएलए कोर्टात उद्या सुनावणी आहे. यावेळी सर्व आरोपीना कोर्टात हजर केलं जाणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी