30 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरक्राईमनात्याला काळिमा : नराधम आईनेच पोटच्या मुलींना फेकले देहविक्रीच्या जाळ्यात

नात्याला काळिमा : नराधम आईनेच पोटच्या मुलींना फेकले देहविक्रीच्या जाळ्यात

विद्यार्थी भारतीच्या जागरूकतेने एका निर्भयाची सुटका; दुसरी पीडित निर्भया मात्र न्यायापासून वंचितच; पोलिस दाखल करून घेईनात आधीच्या अन्यायाबाबत तक्रार

माय-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अंधेरीतील डी.एन. नगर परिसरात उघडकीस आली आहे. नराधम आईनेच पोटच्या मुलींना देहविक्रीच्या जाळ्यात फेकल्याची ही संतापजनक घटना आहे. विद्यार्थी भारती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यातील एका निर्भयाची सुखरूप सुटका केली. (Mother Throw Girls Into Prostitution Vidyarthi Bharathi Helps POCSO Case at DN Nagar Police Station Two Arrested) याप्रकरणी डी.एन नगर पोलिसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून नराधम आईसह दोघांना अटक केली आहे. मात्र, अशाच नरकयातनातून जाव्या लागलेल्या याच पीडितेच्या लहान बहिणीवर झालेल्या आधीच्या अन्यायाबाबत पोलिस तक्रार दाखल करून घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे ही दुसरी लाहाणगी पीडित निर्भया मात्र न्यायापासून वंचितच राहणार आहे.

विद्यार्थी भारती संघटनेतर्फे बागशाळा घेण्यात येते. इथला दिनक्रम व उपक्रम लहानग्यांसाठी पूरक आहे. त्यात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात येतो. याच बागशाळेत येणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीची तिच्या सख्ख्या आईकडूनच अवहेलना होत होती. संघटनेच्या मंजिरी धुरी, युगा गणाई, विजा गणाई, आरती गुप्ता यांनी एकत्र येऊन या गोष्टीचा मागोवा घेत पीडितेला न्याय मिळवून दिला. संघटनेच्या पुढाकाराने एका निर्भयाची सुखरूप सुटका करण्यात आली.

हे सुद्धा वाचा : 

‘महाराष्ट्रात निर्भया फंडातून आमदार-खासदारांना वाहने खरेदी करून दिली जातात’

Digital Rape : देशात पहिल्यांदाच ‘डिजीटल रेप’ प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो मुख्यमंत्र्यांना ऐकायला जात नाही, चंद्रकांतदादा पाटील यांची परखड टीका

भारतीय संस्कृतीत काही नाती खूप पवित्र मानली जातात. त्यामध्येच आई-मुलीचे नाते हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. मात्र, अंधेरीतील डी.एन. नगर परिसरात मानवतेला कलंकित करणारे हे प्रकरण समोर आले आहे. डी.एन नगर पोलिस ठाण्यात विध्यार्थी भारती संघटनेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर आरोपी नराधमांविरोधात भारतीय दंड संहितेच्या आयपीसी कलम 376(2), 38 व लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या कलम 4, 8, 12, 17नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी राजू चक्कीवाला (53) आणि स्वतःच्या पोटच्या गोळ्यास निर्दयीपणे देहविक्री करण्यास प्रवृत्त करणाऱ्या पीडितेच्या आईला (42) अटक केली आहे. त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

स्थानिक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब गरीब असून दारिद्र्यामुळे पीडितेच्या आईने मुलींचे शिक्षण थांबवून त्यांना मोलमजुरीसाठी पाठविले. या दरम्यान मोठ्या बहिणीसोबतच 14 वर्षीय लहान बहिणीसोबतही अत्याचार होऊन ती 2 महिने गरोदर राहिली होती. आरोपी आईने तिचा गर्भपात करून हा गुन्हा लपवला. अल्पवयीन लहान बहिणीसोबत झालेल्या अपराधालासुद्धा आई आणि संबंधित आरोपी जबाबदार आहे. मात्र, त्याची शहानिशा करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत. थोड्याश्या पैशांच्या हव्यासापोटी आईने केलेल्या या नीच कृत्यामुळे दोन अल्पवयीन बहिणी वासनेच्या शिकार बनल्या.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी