30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeक्राईमपाकिस्तान हेरगिरी प्रकरण: DRDO प्रदीप कुरुलकरांची RAW कडून चौकशी!

पाकिस्तान हेरगिरी प्रकरण: DRDO प्रदीप कुरुलकरांची RAW कडून चौकशी!

दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांची गुप्तचर यंत्रणेकडून (रिसर्च अँड अॅनलिसिस विंग – रॉ) चौकशी सुरू करण्यात आली आहे. शास्त्रज्ञ कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याचा आरोप आहे. पाकिस्तानी हेरांना कुरुलकर परदेशात भेटले होते का, त्यांनी हेरांना नेमकी काय माहिती दिली, तसेच ते पाकिस्तानी हनी ट्रॅपमध्ये कसे अडकले, याची माहिती ‘रॉ’च्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

कुरुलकर सप्टेंबर 2022 पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात होते. गुप्तचर यंत्रणेने कुरुलकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते. त्यांच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्याने जानेवारी महिन्यात त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्यावेळी डीआरडीओच्या एका समितीकडे चौकशीसाठी हे प्रकरण सोपविण्यात आले होते. चौकशीत कुरुलकर दोषी आढळल्यानंतर त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला लॅपटॉप आणि मोबाईल राज्य दहशतवादविरोधी पथकातील अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडे सोपविण्यात आला होता.

हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्यानंतर कुरुलकरांनी परदेशात पाकिस्तानी हेरांच्या भेटी कशा आणि केव्हा घेतल्या, यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. कुरुलकर यांनी कार्यालयीन गोपनीय माहिती इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करून पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) गुप्तचर यंत्रणेला दिल्याचे तपासात आढळले आहे. त्यांनी शासकीय गोपनीय माहिती आर्थिक फायद्यासाठी पाकिस्तानला दिल्याचाही संशय आहे.

कुरुलकर देशातील अन्य राज्यांतील काही जणांच्या संपर्कात असल्याची मिळाली. ते पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेरांशी संपर्क साधताना कोणत्या उपकरणांचा वापर करत होते, यादृष्टीने राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) तपास करण्यात येत आहे. त्यांना 9 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत. त्यांच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्याने जानेवारी महिन्यात त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा:

मुंबईत 3 पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती देणाऱ्याला ATS कडून अटक

अजित पवार भाजपसोबत…; शरद पवार स्पष्टचं बोलले

बीबीसीवर ऑन-एअर ब्लंडर, पाकिस्तानी चॅनेल्ससारखाच फनी शो

DRDO Pradeep Kurulkar, RAW , Pakistan espionage case, Pakistan espionage case: DRDO Pradeep Kurulkar interrogation by RAW !

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी