28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeक्राईममुंबईत 66 लाख रुपयांच्या ई सिगारेट्स जप्त; कारचा पाठलाग करत केली कारवाई

मुंबईत 66 लाख रुपयांच्या ई सिगारेट्स जप्त; कारचा पाठलाग करत केली कारवाई

मुंबई पोलिसांनी कारवाई करुन ई सिगारेटचा मोठा साठा जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने हि कारवाई केली आहे. क्राईम ब्रांचचे अधिकारी दाना बंदर येथे एका वेगळ्या कारवाईत व्यस्त असताना तिथे एक कार आली. त्या कारला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला मात्र, कार थांबली नाही. त्यामुळे पोलिसांना संशय असल्याने त्यांनी पाठलाग करुन संशयित गाडी अडवली. गाडीची तपासनी केली असता त्यात युथो थानस या कंपनीचे विविध फ्लेवर्सचे १० कार्ड बँक्स सापडले. प्रत्येक ब़ॉक्स मध्ये ३०० सिगारेटी होत्या. अशा एकून तीन हजार ई सिगारेटी चप्त करण्यात आल्यात. त्याची किंमत सुमारे ६६ लाख रुपये आहे. (E-cigarettes worth Rs 66 lakh seized in Mumbai)

या प्रतरणात पोलिसांनी तस्करीसाठी वापरलेली गाडी ही जप्त केली आहे. या बाबत डोंगरी पोलीस स्टेशन येथे गुन्ह दाखल करुन त्याचा तपास मालमत्ता कक्षाचे अधिकारी करत आहेत. हि कारवाई मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शशिकांत पवार यांच्या मार्ग दर्शनाखाली करण्यात आली. तरुणांमध्ये आता ई सिगारेटचं प्रमाण वाढत आहे. या ई सिगारेटी बेकादेशीर मार्गाने उपलब्ध केल्या जात आहेत. त्याची तस्करी ही केली जात असते. या सर्व पार्श्वभूमीवर या प्रकराकडे पोलीस लक्ष देतील आणि जास्तीत जास्त कारवाई करण्याचा प्रयत्न करतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

शिवसेना शाखेवरुन ठाण्यात ठाकरे-शिंदे गटात राडा

AI इंटेलिजेंसमुळे नोकरी गमावणारा ‘टॉम’ हा पहिला..; IAS सुप्रिया साहू यांचे वास्तववादी ट्विट

हसन मुश्रीफ यांच्या मुलांची अटकपूर्व जामिनासाठी याचिका

मुंबईत अमली पदार्थांची वाढती तस्करी रोखण्यासाठी पोलीस दल सतर्क असते. गुटखा, ड्रग्ज, गांजा असे अनेक अंमली पदार्थ पोलीस कारवाई करुन जप्त करत आहेत. तसेच तस्करी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना जेरबंद करण्यात येत आहे. तरुणांमध्ये वाढती व्यसनाधिनता कमी करण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासन देखील सतर्कतेने काम करत आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी