26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरक्राईमबाॅलीवूडवर पुन्हा ईडीचे संकट, 'पॅडमान' निर्माती प्रेरणा अरोरा अटकेत

बाॅलीवूडवर पुन्हा ईडीचे संकट, ‘पॅडमान’ निर्माती प्रेरणा अरोरा अटकेत

टीम लय भारी

मुंबई : नेतेमंडळी, पोलिस अधिकारी यांच्यानंतर आता बाॅलिवूडमधील लोक सुद्धा ईडीच्या रडारवर आले आहेत. पॅडमान निर्माती प्रेरणा अरोरा यांना आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या बाॅलिवूड सेलिब्रिटींवर ईडीने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यामध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझच्या विरोधात चौकशी सुरू असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते, त्यावर ईडी चार्जशीट दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे सुद्धा सांगण्यात आले असून महाठग सुकेश चंद्रशेखरकडून कोट्यवधी रुपयांचे गिफ्ट घेतल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान सुकेश याची आणखी दहा अभिनेत्रींनी तिहार जेलमध्ये भेट घेतल्याचे माहिती सूत्रांनी काही दिवसांपूर्वी दिली होती, त्यामुळे हे मोठे रॅकेट असल्याची शंका उपस्थित करण्यात येत होती.

राजकीय व्यक्तींच्या मागे लागलेला ईडीचा तिढा आणखी जटील होत चालला आहे तपर दुसरीकडे ईडीने सुद्धा कारवाईचा धडाका सुरू करीत भल्याभल्यांना गजाआड केले आहे, मात्र यावेळी बाॅलिवूडच्या प्रसिद्ध निर्माता प्रेरणा अरोरा यांच्या अटकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे सुद्धा वाचा…

सत्ता संघर्षाच्या तिढयाला ‘राज्यपाल’ जबाबदार ?

चित्रा वाघ यांची आक्रमक भूमिका नव्या सरकार समोर गायब

संजय मंडलिकांनी कोल्हापुरातील शिवसैनिकांची फसवणूक केली : संजय पवार

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!