29 C
Mumbai
Thursday, August 3, 2023
घरक्राईममुंबईत वयोवृद्ध व्यक्तीची सुरक्षा वाऱ्यावर; बोरिवलीतील आढळला वृद्धेचा कुजलेला मृतदेह

मुंबईत वयोवृद्ध व्यक्तीची सुरक्षा वाऱ्यावर; बोरिवलीतील आढळला वृद्धेचा कुजलेला मृतदेह

देशात गुन्ह्यामध्ये राज्याचा दहावा क्रमांक, महिला अत्याचारांमध्ये 12 व्या स्थानी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. त्याला चोवीस तास उलटत नाही तोच, बोरिवली येथील राजेंद्र नगरमध्ये एका श्रीमंत रहिवाशांच्या इमारतीत 78 वर्षीय वृद्धेचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला आहे. सुलोचना भास्कर शेट्टी असे मृत महिलेचे नाव आहे. त्या घरात आजारी पती सोबत राहत होत्या. या घटनेची माहिती मिळताच कस्तुरबा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून हा खून आहे की अन्य काही याचा तपास करत आहेत. दरम्यान, दोन महिन्यापूर्वी लालबागमध्ये एक मुलीने आईची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले होते. त्यामुळे मुंबईत वयोवृद्ध व्यक्तीची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची कुजबूज सुरू झाली आहे.

बोरिवली येथील राजेंद्र नगरच्या एकताभूमी या इमारतीच्या के विंगमध्ये पाचव्या मजल्यावर राहत होत्या. सुलोचना यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली. ही माहिती मिळताच बोरिवली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. फ्लॅट उघडला त्यावेळी सुलोचना यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. त्यांची मुलगी त्यांना दोन दिवसांपासून संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना सुलोचना या मृतस्थितीत आणि त्यांचे पती आजारी स्थितीत आढळून आले. सुलोचना यांना मुलगी असून तिला कळविल्याचे पोलिसांनी सांगितले. सुलोचना भास्कर यांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिसांनी सुलोचना यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. त्यांच्या अंगावर काहीही खूना नसल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. फ्लॅटमध्येही काही संशयास्पद वस्तू आढळून आलेल्या नाही. याप्रकरणी कस्तुरबा पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान काही महिन्यापूर्वी एक मुलीने लालबागमध्ये आईचा खून करून शरीराचे तुकडे रस्त्यावर टाकले होते. शिवाय उरलेल्या शरीराच्या तुकड्यांचा वास येऊ नये म्हणून मेडिकलमधून परफ्यूम खरेदी करत त्या बॉडीवर ते मारत असे.
 हे सुद्धा वाचा
रानकवी ना. धों. महानोर यांचे निधन
प्रदीप कुरुलकरवर देशद्रोहाचा खटला चालवा- जयंत पाटील यांची मागणी
भिडे गुरुजी आम्हाला गुरुजी वाटतात; उपमुख्यमंत्री फडणवीस यांना संभाजी भिडे प्यारे

  मुंबईतील वृद्ध असुरक्षित
देशाची राजधानी असलेल्या मुंबईत दिवसेनदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईसह राज्यातील वयोवृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी पोलिसांनी दिवसातून एकदा घरात एकटेच राहणाऱ्या वृद्ध व्यक्तींची चौकशी केली पाहिजे. अशा सूचना पोलिस दलात वारंवार देण्यात येतात. पण पोलिसांवरच सण बंदोबस्त, व्हिआयपी सुरक्षा, गुन्हे तपास तसेच राज्यातील सत्ता संघर्षानंतर ताण वाढला आहे. त्यामुळे वृद्ध व्यक्तीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी