23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeक्राईमबीड व परभणी प्रकरणी संसदेत आवाज ; दोषींवर तात्काळ कठोर कारवाई...

बीड व परभणी प्रकरणी संसदेत आवाज ; दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी – खा. वर्षा गायकवाड

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आठ दिवसानंतरही मुख्य आरोपीला अटक नाही हे महायुती सरकारचे अपयश.

 

परभणी प्रकरण सरकारने गांभिर्याने घेण्याचे आवाहन खा. वर्षा गायकवाड यांनी काल संसदेत केले आहे. परभणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी वेळीच लक्ष घालून संविधानाची विटंबना करण्यावर त्वरीत कठोर कारवाई केली असती तर पुढच्या घटना घडल्या नसत्या. पण त्यावेळी सत्ताधारी लोक मंत्रिमंडळ बनवण्यात व्यस्त होते त्यामुळे जनतेत मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. (Even after eight days in the case of Sarpanch Santosh Deshmukh’s murder, the main accused has not been arrested.)

 

 

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आठ दिवस उलटूनही मुख्य आरोपीला अटक झालेली नाही. त्यामुळे महायुती सरकारच्या या अपयशावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. काल दिल्लीत पत्रकारांशी बोलताना खासदार वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, परभणी पोलिसांनी अनेक निरपराध व्यक्तींना जेलमध्ये टाकले. जे लोक याप्रकरणी आवाज उठवत होते त्यांचा आवाज दडपण्याचे काम पोलीसांनी केले आहे. सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुर्यवंशी यांना मारहाण झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी विजय वाकोडे हे पाच सहा दिवसापासून शांततेने या प्रकरणी काम करत होते, मात्र त्यांचा ह्रदय विकाराने मृत्यू झाला. परभणी प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी व सोमनाथ सुर्यंवशी यांच्या कुटुंबाला सरकारने २५ लाख रुपयांची मदत करावी याचा वर्षाताई गायकवाड यांनी पुनरुच्चार करत , जनतेने शांतता राखावी व पोलिसांनी निरपराध लोकांना अटक न करता मुख्य दोषीला तात्काळ अटक करण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी