29 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरक्राईममुंबईकरांचे फोन चोरणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद

मुंबईकरांचे फोन चोरणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद

टीम लय भारी

मुंबई : मुंबईकरांचे (Mumbaikars) मोबाईल फोन चोरणारी सात जणांची टोळी मानखुर्द पोलिसांकडून जेरबंद (gang that stole the phones of Mumbaikars was arrested by the police) करण्यात आली आहे. हे चोर फोन चोरून त्यांची बांग्लादेश, नेपाळ, कोलकाता आणि उत्तर प्रदेश येथे नेऊन विक्री करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी या टोळीकडून १७ लाख ८५ हजार रुपये किमतीचे महागडे ७८ मोबाईल्स जप्त केले आहेत. दरम्यान, पोलीस फोनच्या आयएमईआय क्रमांकाच्या आधारे तसेच हे फोन जिथून चोरीला गेले त्यावरून या फोनच्या मालकांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथे एका चोरट्याकडून जबरदस्तीने एका व्यक्तीचा फोन खेचून पोबारा करण्यात आला. याप्रकरणी खबऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून एका २५ वर्षीय चोरट्याला मानखुर्द पोलिसांनी गोवंडीच्या शिवाजीनगर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर या चोरट्याने ज्या व्यक्तीला हा मोबाईल विकला त्याला देखील पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांनी ३१ मोबाईल जप्त केले. यामध्ये अॅप्पल कंपनीच्या २१ महागड्या मोबाईलचा समावेश आहे.

दरम्यान, या मोबाईल चोरीच्या प्रकरणात ज्या व्यक्तीने मोबाईल विकत घेतला, तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. सदर आरोपी चोरीचे मोबाईल विकत घेऊन ते नेपाळ, बांग्लादेश, उत्तर प्रदेश आणि कोलकाता येथे विकत असल्याचे त्याने दिलेल्या माहितीमधून समोर आले आहे. तसेच आरोपीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आणखी पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी मानखुर्द मधील लल्लुभाई कंपाऊंड येथून दोघांना, तर घाटकोपरमधील नित्यानंद नगर येथून एकाला अटक केली आहे. तसेच ४६ मोबाईल देखील या चोरांकडून जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोबाईल्समध्ये सर्वाधिक मोबाईल्स हे अॅप्पल कंपनीचे असल्याची माहिती समोर आली आहे. या चोरांची टोळी मोठी असून याचे परदेशात देखील धागेदोरे असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. या प्रकरणाचा मानखुर्द पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

‘मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ राज्याला द्यायला हवा’, छगन भुजबळ यांची खंत

खासदार धैर्यशील मानेंच्या घराला आले छावणीचे स्वरूप

आरे काॅलनीतील वाहतुक 24 तासांसाठी बंद, कारशेडच्या कामाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!