29 C
Mumbai
Friday, May 19, 2023
घरक्राईमहसन मुश्रीफ यांच्या मुलांची अटकपूर्व जामिनासाठी याचिका

हसन मुश्रीफ यांच्या मुलांची अटकपूर्व जामिनासाठी याचिका

माजी मंत्री हसन मुश्रीफ( hasan mushrif) आणि त्याच्या तिघा मुलांच्या विरोधात कोल्हापूर येथील मुरगुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्हा बाबत हसन मुश्रीफ यांच्या तिघा मुलांनी आता अटक पूर्व जामिनासाठी मुंबई सेशन कोर्टात ( mumbai session court) धाव घातली आहे.नावीद , आबीद आणि साजिद यांनी अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर आज सुनावणी झाली. ईडी (ED) कोर्टात त्याच्यावर सुनावणी झाली. ( hasan mushrif family move for anticipatory bail )

हसन मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांच्या मतदार संघात सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या नावाने खाजगी साखर कारखाना उभारण्यात येणार होता.त्यासाठी विभागातील हजारो शेतकऱ्या कडून प्रत्येकी १० हजार रुपये गोळा करण्यात आले होते. हि रक्कम सुमारे ४० कोटी रुपये होती.पैसे गोळा केले मात्र, कारखाण्याचे शेअर देण्यात आले नाही ,हि रक्कम मुश्रीफ यांनी स्वताच्या खाजगी कारख्याण्यासाठी वापरली, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.या बाबात विवेक कुलकर्णी यांनी तक्रार केली आहे. त्या अनुशगाने २५ फेब्रुवारी रोजी. मुरगुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात अनेकांना आरोपी दाखवण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा 

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा प्रकरण ; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलांची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

महत्वाची बातमी : यापुढे नोकरभरतीत ट्रान्सजेंडरनाही आरक्षण; पोलीस दलातही ‘तिसरा पर्याय’

चिंताजनक : भारत पुन्हा हिंदू विकास दराकडे; रघुराम राजन यांचा इशारा

यात प्रामुख्याने हसन मुंश्रीफ हे आरोपी आहेत. त्याच्या प्रमाणे त्या्च्या मुलांना आरोपी दाखवण्यात आलेलं नाही.मात्र, त्यांना ईडी कडून अटकेची भीती वाटत आहे. यामुळे त्यांनी अटक पूर्व जामिनसाठी अर्ज केला आहे. मुश्रीफ कुटुंबियासाठी अँड अमीत देसाई ,एॅड आबाद फोंडा आणि अँड प्रशांत पाटील यांनी युक्तीवाद केला .यावेळी ईडीचे अधिकारी ही हजर होते.आज वेळ कमी पडल्याने हि सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी