33 C
Mumbai
Saturday, May 27, 2023
घरक्राईम30 कोटींची संपत्ती असणाऱ्या IASच्या आजी-आजोबांनी जीवन संपवलं!

30 कोटींची संपत्ती असणाऱ्या IASच्या आजी-आजोबांनी जीवन संपवलं!

मुलाकडे कोटींची संपत्ती असूनही वृद्ध आईवडिलांना खायला शिळी आणि कोरडी चपाती द्यायचा. हे असं किती दिवस जगायचं म्हणून या वृद्ध दाम्पत्याने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. हे वृद्ध दाम्पत्य एका आयएएस अधिकाऱ्याचे आजी-आजोबा असल्याची माहिती आहे.

30 कोटींची संपत्ती असणाऱ्या मुलाकडे शिळी चपाती खावी लागते, हे गोड विष मी किती दिवस खाल्लं असतं, असे म्हणत हरियाणाच्या आजी-आजोबांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. स्वतःच्याच कुटुंबाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या या वृद्ध दाम्पत्याने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हे हृदय पिळवटून टाकणारं प्रकरण हरियाणातील चखरी दादरी येथील आहे. मुलगा शिळी चपाती खायला देतो म्हणून वृद्ध जोडप्याने विष प्राशन करून आपले जीवन संपवले. ही कहाणी आयएएस विवेक आर्य यांच्या आजी-आजोबांची आहे. ते सध्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी आहेत. विवेक आर्य यांनी 2021 मध्ये UPSC, CSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

हरियाणातील बधडा येथे राहणारे जगदीशचंद्र आर्य (वय78)आणि भागाली देवी (वय77) हे मुलगा वीरेंद्र आर्य यांच्यासोबत राहात होते. त्यांनी गुरुवारी (30 मार्च) रात्री विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली. तसेच, फोन करून पोलिसांना आत्महत्या करत असल्याची माहितीही दिली. दरम्यान फोन येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. त्यावेळी जगदीश चंद्र यांची प्रकृती खूप खालावलेली दिसली. तात्काळ त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्यांना दादरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, येथे डॉक्टरांनी जगदीश चंद्र आणि त्यांच्या पत्नीला मृत घोषित केले.

30 कोटींची संपत्ती असणाऱ्या IASच्या आजी-आजोबांनी जीवन संपवलं!

दरम्यान पोलिसांना घरात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये जगदीश चंद्र यांनी लिहिले आहे की, “माझ्या मुलाची बधडा येथे ३० कोटींची संपत्ती आहे. परंतु, तरीही त्याच्याकडे मला देण्यासाठी एक चपाती नाही. घरातून बेदखल केल्यानंतर जगदीश चंद्र यांनी दोन वर्षे वृद्धाश्रमात घालवली होती, त्या दरम्यान त्यांच्या पत्नीला अर्धांगवायू झाला. परत, आल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या मुलाने त्यांना काही काळ सांभाळलं. पण, काही काळाने या दाम्पत्याला त्यांच्याच कुटुंबीयांनी शिळी चपाती देण्यास सुरुवात केली. जगदीश चंद्र पुढे लिहितात की, त्यांना खायला शिळी चपाती देण्यात यायची. हे गोड विष किती काळ खायचं, म्हणूनच आम्ही सल्फासची गोळी खाल्ली.

दोन महिलांसह चार जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी डीएसपी वीरेंद्र श्योराण यांनी सांगितले की, जगदीश चंद्र यांनी एका खासगी रुग्णालयात पोलिसांना पत्र दिले होते. ही सुसाईड नोट मानली जाऊ शकते. कुटुंबीयांचा छळ होत असल्याचा आरोप करत मृताने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याचवेळी, मृताचा नातू आयएएस अधिकारी असून सध्या प्रशिक्षणार्थी आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा: एनकाउंटर स्पेशालिस्ट दया नायकांची मुंबईत बदली..!

प्रेरणादायी: हमाल ते IAS अधिकारी; रेल्वेच्या फ्री वायफायवरून अभ्यास करणाऱ्या श्रीनाथची कहाणी वाचा

AI इंटेलिजेंसमुळे नोकरी गमावणारा ‘टॉम’ हा पहिला..; IAS सुप्रिया साहू यांचे वास्तववादी ट्विट

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी