24 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeक्राईममुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची १० व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची १० व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या

लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार असल्याने राज्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा निकालाच्या तयारीत गुंतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे मुंबईतील मंत्रालयाच्या समोरील इमारतीच्या १० व्या मजल्यावरून उडी मारत एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार असल्याने राज्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा निकालाच्या तयारीत गुंतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे मुंबईतील मंत्रालयाच्या समोरील इमारतीच्या १० व्या मजल्यावरून उडी मारत एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने (IAS officer’s daughter) आत्महत्या ( suicide) केल्याची घटना घडली आहे.(IAS officer’s daughter commits suicide by jumping off 10th floor in Mumbai)

याबाबत मिळालेल्या माहिती यांची कन्या आहे. मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीमध्ये लिपी ही आपल्या विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या आयएएस आई वडिलांसोबत राहत होती. रस्तोगी यांची मुलगी लिपी ही वकिलीचे शिक्षण घेत होती. लिपी ही अभ्यासात आपले आई-वडिल यांच्या इतकी हुशार नसल्याने ती नैराश्यात होती. आपले आई-वडील इतके मोठे अधिकारी असूनही आपण त्यासाठी पात्र आहोत की नाही ही भीती लिपीला सतावत होती. त्यामुळे तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, लिपी रस्तोगी हिने इमारतीच्या १० व्या मजल्यावरुन उडी मारल्यानंतर ती खाली कोसळली. त्यानंतर तात्काळ तिला पुढील उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तसेच लिपी हिने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात तिने आपल्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरलेले नाही. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी