27 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरक्राईमShrddha Valkar: मूड खराब असला तर 35 काय 36 तुकडे करू शकतो...;...

Shrddha Valkar: मूड खराब असला तर 35 काय 36 तुकडे करू शकतो…; श्रद्धाच्या हत्येचे समर्थन

तो युवक आफताबच्या समर्थनात असं म्हणत होता की, ज्या माणसाचा मूड खराब असतो तो 35 काय 36 तुकडे करू शकतो.

दिल्लीमधील श्रद्धा वालकर हत्याकांड यावर सर्वत्र देशभरात चर्चेला उधाण आहे. त्यावर अनेकांच्या विविध स्तरावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक लोकांनी त्यावर तीव्र संताप देखील व्यक्त केला आहे. श्रध्दा वालकरला न्याय मिळावा यासाठी सोशल मीडिया ट्रेंड देखील सुरु आहे. त्यातच सोशल मीडिया वर एक व्हिडिओ तुफान वायरल होताना पाहायला मिळतोय. या व्हिडिओमध्ये राशिद खान नावाचा युवक जो बुलंदशहराचा रहिवासी आहे असं तो म्हणत आहे.

तो युवक आफताबच्या समर्थनात असं म्हणत होता की, ज्या माणसाचा मूड खराब असतो तो 35 काय 36 तुकडे करू शकतो. या व्हिडिओ मध्ये एक महिला पत्रकार काही लोकांना श्रध्दा वालकरच्या हत्ये विषयी लोकांनां प्रश्न विचारते, त्यावर तिथे उपस्थित असलेल्या तरुणाला ती प्रश्न विचारते की, श्रद्धा मर्डर केस बद्दल तु ऐकले आहेस का ? हे किती योग्य आहे ? त्यावर तो ‘एखादया माणसाला राग आला की, तो 35 काय 36 तुकडे ही करू शकेल एखादयाचे तुकडे करने काही मोठी गोष्ट नाही. चाकू घ्या आणि कापत जा’… ‘मोठ्या उद्दामपणे त्याने हे विधान केले आहे. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत चौकशी सुरु केली आहे. अद्याप तरुणाची कोणती ही माहिती मिळालेली नाही आहे.त्यातच या वायरल व्हिडिओ नंतर लोक त्याच्या अटकेची मागणी करत आहेत.

हे सुध्दा वाचा

Shraddha Murder Case : ‘जे झालं ते चुकून झालं!’ श्रद्धा हत्याकाडांचा आरोपी आफताबची न्यायालयासमोर कबूली

Shraddha Murder Case : उत्तर प्रदेशातही श्रद्धा हत्याकाडांची पुनरावृत्ती; धक्कादायक प्रकार उघडकीस

Supriya Sule : ‘श्रद्धा हत्याकांडाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करा!’ सुप्रिया सुळेंची मागणी

दुसरीकडेच, श्रद्धा वालकर प्रकरणी आरोपी आफताबला साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. आरोपी आफताबच्या कोठडीत 4 दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान आफताबने न्यायालयातील न्यायाधीशांसमोर आपला गुन्हा कबुल केला. जे काही झाले ते चुकून झाले. त्या वेळी भयंकर राग आला होता त्या रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली असं तो म्हणाला.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!