मुंबईच्या IIT बॉम्बेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अधिकच गुंतागुंतीचे बनत चालले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) मधील एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने ऑन-कॅम्पस हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली होती. कॅम्पसमध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला होता. यामुळेच दर्शन सोळंकी याने आत्महत्या केल्याचाही आरोप होता. या घटनेचा तपास करण्यासाठी अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने त्यांचा रिपोर्ट केंद्र सरकारला सादर केला आहे.
दर्शन सोळंकी असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून हा विद्यार्थी गुजरातमधील अहमदाबाद येथील असून तो आयआयटीमध्ये केमिकल इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11.30 वाजता विद्यार्थी सातव्या मजल्यावरून पडला होता. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट देखील मिळाली नाही.
त्याचप्रमाणे अंतिम अहवालात म्हटले आहे की, “विविध विषयांच्या परीक्षेत दर्शन सोळंकीची कामगिरी खराब होत होती. विशेषतः सेमिस्टरच्या दुसऱ्या सहामाहीत, खराब शैक्षणिक कामगिरीचा त्याच्यावर वाईट परिणाम झाल्याची शक्यता आहे. दर्शन अनेकदा मित्रांशी चर्चा करताना बोलत असे की आयआयटी बॉम्बे मधून बी.टेकचा अभ्यास सोडून आपल्या गावी कुठेतरी प्रवेश घेईल. दरम्यान अहवालात असे म्हटले आहे की, दर्शन सोळंकीच्या बहिणीने कॅम्पसमध्ये जातीय भेदभावाबद्दल बोलले होते. मात्र, तिच्या विधानाव्यतिरिक्त, दर्शनाला जातीय भेदभावाला सामोरे जावे लागल्याचा कोणताही प्रत्यक्ष पुरावा आढळला नाही. दर्शनचे वडील रमेशभाई यांना अहवालाची प्रत मिळाली आहे. मात्र, त्यांनी ती फेटाळून लावली आहे.
विद्यार्थी संघटनेची मागणी
IIT कॅम्पसमधील APPSC- IIT आंबेडकर- पेरियार- फुले स्टुडंट सर्कल या विद्यार्थी संघटनेने दर्शन सोळंकी संदर्भात एक प्रेस रिलीज जारी केलं होतं. आंबेडकर-पेरियार-फुले स्टुडंट सर्कल स्टुडंट सर्कल या विद्यार्थी संघटनेने जातीवरुन छळ होत असल्याने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दर्शन सोळंकी यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आयआयटी बॉम्बेने समिती स्थापन केली होती. या प्रकरणी निदर्शने देखील करण्यात आली.
हे सुद्धा वाचा :
पवईतील आयआयटीच्या विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
IIT बॉम्बेतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी जातीय भेदभावाचा आरोप
VIDEO: IIT शुल्कवाढी विरोध विद्यार्थ्यांचे उपोषण, राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार