35 C
Mumbai
Thursday, May 11, 2023
घरक्राईमIIT बॉम्बेतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी जातीय भेदभावाचा आरोप

IIT बॉम्बेतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी जातीय भेदभावाचा आरोप

मुंबईतील पवई येथील आयआयटी बॉम्बेमध्ये (IIT Bombay) शिकणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने रविवारी वसतीगृहाच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या (student suicide) केली. मृत विद्यार्थ्याचे नाव दर्शन सोळंकी असून तो गुजरात मधील अहमदाबादचा रहिवासी होता. आयआयटी बॉम्बेमध्ये तो बी. टेकच्या पहिल्या वर्षात शिकत होता. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसून त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत या प्रकरणी तपास सुरु केला आहे. दरम्यान आयआयटी बॉम्बेतील आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल (APPSC IIT Bombay) या विद्यार्थ्यांच्या एका संघटनेने जातीय भेदभावामुळे त्याने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. (IIT Bombay student’s suicide Allegations of caste discrimination)

APPSC IIT Bombay ने याबाबत एक ट्विट केले असून त्यात म्हटले आहे की, दर्शन सोळंकी या १८ वर्षीय दलित विद्यार्थ्याच्या मृत्युबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो, ज्याने ३ महिन्यांपूर्वी @iitbombay मध्ये BTech करण्यासासाठी प्रवेश घेतला होता. आपण हे समजून घेतले पाहिजे की हा वैयक्तिक/व्यक्तिगत मुद्दा नसून संस्थात्मक खून आहे. आमच्या तक्रारी असूनही संस्थेने याची दखल घेतली नाही. दुसऱ्या एका ट्विटमध्ये APPSC IIT Bombay ने म्हटले आहे की, दलित बहुजन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक आणि सुरक्षित वातावरण हवे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आरक्षणविरोधी दृष्टीकोन असलेल्यांचा आणि पात्र नसलेल्या आणि गुणवत्ता नसलेल्या टोमण्यांचा खुपच त्रास सहन करावा लागतो. येथे उपेक्षित वर्गातील प्राध्यापक आणि समुपदेशकांच्या प्रतिनिधित्वाचा अभाव आहे.

तिसऱ्या एका व्टिटमध्ये APPSC IIT Bombay ने म्हटले आहे की, ”अजून किती दर्शन आणि अनिकेत मरायचे? दर्शन सोळंकी याची संस्थात्मक हत्या असल्याचे आमचे म्हणणे आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबाप्रती आमची सामूहिक जबाबदारी आहे. एक समाज म्हणून, एक संस्था म्हणून आपण काय साजरे करतो आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्षित करतो आहोत?” या ट्विटसोबत अजून किती दर्शने आणि अनिकेत मरायचे आहेत? दर्शन सोलंकी यांच्या संस्थात्मक हत्येबाबत स्टेटमेंट या आशयाखाली एक प्रसिद्धीपत्रक देखील देण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी