26 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरक्राईमगुवाहाटी आयआयटीमध्ये नागपूरच्या विद्यार्थ्याचा गुढ मृत्यू

गुवाहाटी आयआयटीमध्ये नागपूरच्या विद्यार्थ्याचा गुढ मृत्यू

आयआयटी गुवाहाटीमध्ये (IIT Guwahati) अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत दुसरी मृत्यूची घटना समोर आली आहे. आयआयटी गुवाहाटीमध्ये बीटेकच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मृतदेह सोमवारी होस्टेलमधील (Hostel) त्याच्या खोलीत आढळून आला. (Student’s mysterious death) या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून अद्याप विद्यार्थ्याच्या मृत्यूमागील कारण समोर आलेले नाही.

मृत विद्यार्थ्याचे नाव हृतिक भवानी असे असून तो मुळचा नागपूरचा होता. या विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नसून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. हृतिक भवानी याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
दरम्यान डिसेंबर महिन्यात आयआयटी गुवाहाटीमध्ये एका प्राध्यापकाने देखील आत्महत्या केल्याचे समोर आले होते. समीर कमल असे त्या मृत प्राध्यापकांचे नाव होते. ते आयआयटीमध्ये गणित विषय शिकवत होते. त्यांच्या मृतदेह कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांच्यावर उद्या होणार शस्त्रक्रिया; काही दिवस विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

कुणबी जोडो अभियानातून रायगडमध्ये एकटवला कुणबी समाज

मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू!

दरम्यान हृतिक भवानी याच्या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. त्याचा मृतदेह गुढरित्या त्याच्या होस्टेलच्या रुममध्ये आढळून आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी