‘जय श्री राम’चा नारा दिला नाही म्हणून एका इमाम युवकावर हल्ला करण्यात आला. ही घटना महाराष्ट्रातील जालनाध्ये घडली. रविवारी सायंकाळी पीडित झाकीर सय्यद खाजा हा भोकरदन तहसीलमधील अन्वा गावातील मशिदीत एकटाच होता. ‘जय श्री राम’ म्हणण्यास नकार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी इमामवर प्राणघातक हल्ला केल्याचे काही माध्यमांच्या अहवालात म्हटले आहे. रविवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एका गावात अज्ञात व्यक्तींनी मशिदीत घुसून, एका इमामावर प्राणघातक हल्ला केला आणि त्याची दाढी कापली. पीडित बेशुद्ध अवस्थेत आढळून आला आणि त्याला औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (जीएमसीएच) दाखल करण्यात आले आहे. पीडित झाकीरला बेशुद्ध करण्यासाठी हल्लेखोरांनी रसायनाने माखलेल्या कापडाचा वापर केला. पीडितेने सांगितले की, तो शुद्धीवर आल्यानंतर त्याला त्याची दाढी कापलेली आढळली, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी भेट दिली आणि शांतता राखण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती निरीक्षक अभिजित मोरे यांनी दिली.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनीही सोशल मीडियावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मैं उप.मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी (@Dev_Fadnavis) से मांग करता हूँ की जालना के भोकरदन अनवा गांव मस्जिद में घुसकर एक मौलाना की दाढ़ी निकालकर मारपीट करने वाले व साम्प्रदायिक तनाव फ़ैलाने वाले उपद्रवियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए।
CC:@DGPMaharashtra@sp_jalna #Jalna pic.twitter.com/KKXybIxq8v
— Abu Asim Azmi (@abuasimazmi) March 27, 2023
हे सुद्धा वाचा :
श्रीराम नवमी 2023: श्रीराम जन्मोत्सवाच्या ‘या’ खास गोष्टी जाणून घ्या..