29 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeक्राईमIPS अधिकाऱ्याने घरकाम करणाऱ्या महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी

IPS अधिकाऱ्याने घरकाम करणाऱ्या महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी

पुण्यात नियुक्त असलेले आयपीएस अधिकारी निलेश अष्टेकर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार एका घरकाम करणाऱ्या महिलेनं दाखल केली आहे. गुन्ह्याचा क्रमांक 215/2023 असा आहे. निलेश अष्टेकर हे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पुणे कार्यलयात नियुक्त आहेत. त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिला ही ठाणे कळवा येथे राहते. ती घरकाम करते. तिचा फेसबुकवर अकाउंड आहे. अष्टेकर यांनी तिला फेसबुक मेसेंजर वर एक फेब्रुवारी 2023 रोजी हाय असा मेसेज केला. फ्रोफाईल फोटोवरून ते जबाबदार नागरिक असल्याचे दिसत असल्याने तक्रारदार महिलेने त्यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर अष्टेकर तिला सतत मॅसेज करू लागले फोन करू लागले.

आपण आयपीएस आहोत. सध्या पोलीस भारतीचे काम करत आहोत. तुला पोलीस भरती व्हायचे आहे का, असे विचारत होते. आपल्याला नाही माझ्या बहिणीच्या मुलाला भरती व्हायचं आहे, असे तक्रारदार महिला म्हणाली. महिलेची गरज ओळखून मग अष्टेकर तिला सतत फोन करू लागले. व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल करू लागले. यावेळी ते घरकाम करणाऱ्या या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करू लागले. अश्लिल बोलत असायचे. व्हिडिओ कॉलवर नग्न असायचे. 27 मार्च 2023 रोजी अष्टेकर यांनी भयानक प्रकार केला. यामुळे अखेर त्या महिलेने त्याना व्हाट्सएपवर ब्लॉक करून टाकलं.

सदर प्रकरणे महिला पुरती घाबरली होती. ती अशिक्षित आहे, त्यामुळे तिला काय करावे, हे सुचत नव्हतं. अखेर त्या ऍड. चित्रा साळुंखे यांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार केली. त्यानंतर 2 मे 2023 रोजी निलेश अष्टेकर यांच्या विरोधात 271/2023 क्रमांकाचा गुन्हा नोंदवण्यात आला.

हे सुद्धा वाचा

मन की बात @100: गैरहजर विद्यार्थ्यांना 100 रूपयांचा दंड?

गोपीचंद पडळकरांचे ट्विट; नाव न घेता शरद पवारांवर साधला निशाना

दर्शन सोळकी आत्महत्या प्रकरण आयआयटी विद्यार्थी खत्री यांच्या जामिनावर उद्या निकाल

हा गुन्हा भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 354(2), 354 A(3) , 354 D आणि 509 नुसार दाखल करण्यात आला आहे. अष्टेकर यांनी तक्रारदार महिलेच्या अल्पवयीन मुलीबाबत अश्लिल बोलणे केले होते. अल्पवयीन मुलीबाबत ही शरीर सुखाची मागणी केली होती. यामुळे या गुन्हात पोस्को कायद्याची कलम लावण्याची मागणी ही ऍड. चित्रा साळुंखे यांनी केली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी