28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeक्राईममाण-खटाव - पुन्हा हिट अँड रन, जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने दोन...

माण-खटाव – पुन्हा हिट अँड रन, जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने दोन तरुण दुचाकीस्वारांना उडवले; तरुणांचा जागीच मृत्यू

आमच्या डोळ्यासमोर दोघांना उडवले, तुम्हीच आम्हांला न्याय द्या, नातलगांची मागणी(Both were blown up in front of our eyes, you give us justice, relatives demand). माण-खटाव : भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पियोने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवर स्वार दोन तरुणांचा मृत्यू झाला. अनिकेत नितीन मगर आणि रणजीत राजेंद्र मगर या दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयकुमार गोरे यांचे फाजिल लाड पुरविले

ही काळ्या रंगांची स्कॉर्पिओ (वाहन क्रं – MH 11 DN 0100 ) जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील असून त्यांच्या मर्जीतल्या एका कंत्रादाराने ही कार गोरेंना भेट म्हणून दिल्याचे समजते. आमदार जयकुमार गोरे यांच्या जवळचा कार्यकर्ता अपघाताच्या वेळी कारमध्ये होता. अपघात झाल्यावर स्कॉर्पिओतील हा कार्यकर्ता पळून गेला आणि या कारमधील दुसरी व्यक्ती ही चालक असल्याची बतावणी करत समोर आली. ही घटना घडूनही अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. जयकुमार गोरे आपले राजकिय वजन वापरून आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला या गुन्ह्यात शिक्षा होऊ देणार नाहीत अशी भीती मयत तरुणांच्या वृध्द आईवडील आणि नातलगांना आहे. यामुळे मृताचे नातेवाईक आणि अपघाताचे साक्षीदार दीपक मगर यांनी लयभारी न्युज चॅनल ला फोन करून आमच्या डोळ्यासमोर दोघांना उडवले , तुम्हीच आम्हांला न्याय द्या’ अशी मागणी संपादक तुषार खरात यांच्याकडे घातली.

जयकुमार गोरे यांनी पाणी आणलं नाही | आमदार गावटग्यांना भेटतात, शेतकऱ्यांना नाही | Man Khatav

उतरत्या वयात आईवडिलांना तरुण मुलांचा अंत्यसंस्कार करायला लावणाऱ्या या दुर्घेटनेमुळे गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. जयकुमार गोरे यांनी भ्रष्टाचार करून आणि गावगुंडांना सोबत ठेवून तालुक्यांत फाजील आणि थिल्लर संस्कृती रुजवली असून त्याचे दुष्परिणाम गावकऱ्यांना भोगावे लागत आहे,अशी गावकऱ्यांमध्ये भावना आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी