31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeक्राईमकर्नाटक सेक्स टेप प्रकरण: प्रज्ज्वल रेवण्णाला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी

कर्नाटक सेक्स टेप प्रकरण: प्रज्ज्वल रेवण्णाला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी

कर्नाटकमधील सेक्स टेप प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णाला आज पोलिसांनी बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली होती. तसेच त्याला आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयाने आता त्याला आता ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महिन्याभरापूर्वी सेक्स टेप प्रकरण उजेडात आल्यानंतर प्रज्वल रेवण्णाने भारतातून पळ काढला होता. तसेच तो जर्मनीत असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याने एक व्हिडीओ शेअर करत आपण ३१ मे रोजी भारतात आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार प्रज्वल रेवण्णा आज सकाळी भारतात दाखल झाला.

कर्नाटकमधील सेक्स टेप प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णाला (Prajwal Revanna) आज पोलिसांनी बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली होती. तसेच त्याला आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयाने आता त्याला आता ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महिन्याभरापूर्वी सेक्स टेप प्रकरण उजेडात आल्यानंतर प्रज्वल रेवण्णाने (Prajwal Revanna) भारतातून पळ काढला होता. तसेच तो जर्मनीत असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याने एक व्हिडीओ शेअर करत आपण ३१ मे रोजी भारतात आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) आज सकाळी भारतात दाखल झाला.(Karnataka sex tape case: Prajwal Revanna sent to police custody till June 6)

दरम्यान, रेवण्णा भारतात दाखल होताच कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. तसेच त्याला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

नेमकं प्रकरण काय?
जवळपास महिन्याभरापूर्वी कर्नाटकमधील मतदानानंतर हे सगळं प्रकरण उघड झालं. प्रज्वल रेवण्णाच्या ड्रायव्हरनंच या सगळ्या क्लिप असणारा पेनड्राईव्ह पोलिसांच्या हवाली केला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाचा शोध सुरू केला. मात्र, तोपर्यंत तो विदेशात फरार झाला होता. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटिसाही काढण्यात आल्या होत्या. गेल्या महिन्याभरात त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता. तसेच, त्याच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर कोणतंही भाष्य किंवा बाजू मांडण्यात आली नव्हती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी