भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा खासगी व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. १७ जुलै रोजी हा व्हिडीओ लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीने प्रसारित करुन त्यावर वृत्त दिले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विधिमंडळात विरोधकांनी देखील हे प्रकरण लावून धरले होते. या व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी (दि.5) रोजी रात्री पोलिसांनी लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमेलश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
यावृत्ताला कमलेश सुतार यांनी देखील दुजोरा दिला असून त्यांनी सोशल मीडिया साईट फेसबुक आणि एक्स (ट्विटर)वर याबाबत माहिती दिली आहे. लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांच्याबरोबर अनिल थत्ते यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाल्याचे समजते. भादवी कलम 500 (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमाअंतर्गत हा गुन्हा दाखल झाल्याचे समजते. या व्हिडीओप्रकरणी किरीट सोमय्या यांनी पोलिसात तक्रार केली होती. त्या आधारे पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सुतार यांची काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. त्यानंतर काल रात्री त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस तपासात या आधीही सहकार्य केले होते, यानंतरही करू.
मात्र,असं असलं तरीही जनतेची भूमिका आणि प्रश्न मांडण्याचे काम अव्याहतपणे सुरू राहील ! #लोकशाही
— Kamlesh Sutar (@kamleshsutar) September 6, 2023
दरम्यान लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांनी यावृत्ताला दुजोरा दिला असून पोलिसांनी आपल्यावर गुन्हा दाखल केल्याचे सोशल मीडियावर साइट फेसबुक आणि ‘एक्स’ (ट्विटर)वर सांगितले आहे. ”भाजप नेते किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासात या आधीही सहकार्य केले होते, यानंतरही करू. मात्र, असं असलं तरीही जनतेची भूमिका आणि प्रश्न मांडण्याचे काम अव्याहतपणे सुरू राहील !” असे ट्विट सुतार यांनी केले आहे.
हे सुद्धा वाचा
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली! उपोषणाचा नववा दिवस..
आज 6 सप्टेंबर.. आजच्याच दिवशी भारताने दिली नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला परवानगी
आज जन्माष्टमी, भारतीयांसाठी जन्माष्टमीचं महत्त्व जाणून घ्या..
किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करत, सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे एक पेनड्राइव्ह सुपूर्द करत चौकशीची मागणी देखील केली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी करणार असल्याची सभागृहात सांगितले होते.