28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeक्राईमवाढदिवशी किस करुन सेल्फी घेतला, व्हायरल करण्याची धमकी देऊन केले वारंवार अत्याचार

वाढदिवशी किस करुन सेल्फी घेतला, व्हायरल करण्याची धमकी देऊन केले वारंवार अत्याचार

मुंबईत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाविरोधात त्याच्याच वयाच्या मैत्रिणीसोबत बलात्कार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

मुंबईत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाविरोधात त्याच्याच वयाच्या मैत्रिणीसोबत बलात्कार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. त्याच्याविरोधात पोस्को कायद्याअन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर आरोपी पीडितेला किस करतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होता. या प्रकरणी आरोपीला शुक्रवारी त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.
पीडित मुलगी व आरोपी दोन्ही एकमेकांचे मित्र असून मैत्रिणीच्या वाढदिवशी वांद्रे येथील कार्टर रोडवर दोघे फिरायला गेले असताना त्यांनी चुंबन घेतले व केवळ चुंबन घेऊन न थांबता त्यांनी सेल्फी देखील घेतले. १० ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. त्यानंतर चुंबन करतानाचे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन या अल्पवयीन आरोपीने १० ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत १७ वर्षीय मैत्रिणीवर सातत्याने बलात्कार केला, अशी तक्रार पीडितेने केली आहे.

आरोपीकडून ब्लॅकमेल केले जात असल्याने पीडितेने ही घटना कुणालाही सांगितली नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वी हा आरोपी पीडितेला भेटण्यासाठी तिच्या महाविद्यालयात आला. त्यावेळी पीडितेने त्याच्या सोबत बाहेर फिरायला जाण्यास नकार दिला. त्यावेळी रागावलेल्या या आरोपीने पीडितेला धक्काबुक्की करुन मारहाण केली. त्यामुळे पीडितेच्या मैत्रिणींनी या मारहाणीच्या प्रकाराबाबत तिच्या आई वडिलांना माहिती दिली, त्यानंतर आरोपीकडून ब्लॅकमेल केले जात असल्याच्या व बलात्कार करण्यात आल्याच्या प्रकाराचा खुलासा झाला.

हे सुध्दा वाचा

पुण्यात चंद्रकांत पाटलांचे तोंड काळे; महापुरुषांच्या अवमानाविरोधात कार्यकर्त्यांनी केली शाईफेक !

ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड

युट्यूबवरच्या अश्लील जाहिरातीमुळे नापास झालो, आता ७५ लाख रुपये द्या, भरपाईची मागणी करणाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला दंड

पीडितेच्या मैत्रिणींनी तिच्या पालकांना महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पालकांनी पीडितेसोबत संवाद साधला. तेव्हा तिने ही माहिती पालकांना दिली. त्यानंतर खेरवाडी पोलिस स्थानकात जावून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. मात्र सुरुवातीची किस व सेल्फीची घटना खार पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा व त्याचा तपास खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

‘लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२’ हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने २०१२ साली तयार केलेला कायदा आहे. ‘पोक्सो’ हे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्च्युअल ओफेन्सेसचे लघुरूप आहे. कथुआ आणि उन्नाव येथे बालिकांवर बलात्कार झाल्याच्या घटनांनंतर गुन्हेगारांना अधिक कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने पोक्सो कायद्यात बदल करण्यात आले. त्यानुसार आता बारा वर्षांखालील मुलींवर बलात्कार केल्यास गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात येईल. १६ वर्षांवरील मुलींवर बलात्कार केल्यास कमीत कमी १० वर्षे ते २० वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी