27 C
Mumbai
Monday, September 18, 2023
घरक्राईमअंधश्रद्धेचं भूत..करणी केल्याच्या संशयावरून शेजाऱ्याला संपवलं

अंधश्रद्धेचं भूत..करणी केल्याच्या संशयावरून शेजाऱ्याला संपवलं

कोल्हापुर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सहकुटुंब घरात जेवत असताना करणी केल्याच्या संशयातून घरात घुसून तलवारीने सपासप वार करुन एकाचा निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापूर शहरात घडली. मद्यधुंद अवस्थेत शेजारच्या घरात घुसून तलवारीने हल्ला करत एकाचा खून केला आहे. आझाद मकबूल मुलतानी (वय, 54) असं या हल्ल्यात मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मुलतानी यांची सून अफसाना मुलतानी ही या हल्ल्यात जखमी झाली आहे. शहरातील टेमलाई नाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मंगळवार १६ मे रोजी रात्री आझाद मुलतानी हे आपल्या सुनेसह रात्री साडे आठच्या सुमारास जेवण करण्यासाठी बसले होते. यावेळी अचानक शेजारी राहणारा निखिल गवळी हा दारूच्या नशेत तलवारीसह घरात घुसला आणि माझ्या घरावर करणी करता का? असं म्हणत मुलतानी यांच्या सुनेवर हल्ला केला. यावेळी आझाद मुलताने हे आपल्या सुनेच्या बचावासाठी पुढे आले. त्यांना पाहताच आरोपीने त्यांच्यावरही तलवारीने जोरदार हल्ला करत मुलतानी यांच्या खांद्यावर छातीवर आणि मांडीवर सपासप वार केले. या हल्ल्यात हातावर वर्मी घाव बसल्याने रक्ताच्या ठराव्यात ते जागीच कोसळले. कुटूंबियांनी आरडा ओरडा करताच हल्लेखोर पसार झाला. यानंतर मुलांसह नातेवाईकांनी आझाद मुलतानी यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान हल्ल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन खुनाची कबुली दिली आहे. यामध्ये त्याने करणी केल्याच्या संशयातून ही हत्या केल्याचे सांगितले आहे. या भयंकर प्रकारामुळे संपूर्ण कोल्हापूर शहरात भितीचे वातारण पसरले आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : 

संतापजनक: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेची मातीत तोंड दाबून हत्या

माता न तू वैरिणी: प्रियकराच्या मदतीने निर्दयी मातेने घेतला लेकराचा जीव

धक्कादायक: नशा करणाऱ्या बॉडीबिल्डरने जन्मदात्यांवरच केले चाकूने वार

Kolhapur neighbor was killed on the suspicion of Karni

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी