30 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरक्राईमभाजप युवा आघाडीच्या नेत्याच्या हत्येचे गुढ वाढले

भाजप युवा आघाडीच्या नेत्याच्या हत्येचे गुढ वाढले

टीम लय भारी

बंगळूरू : कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे येथे भाजप युवा आघाडीचे नेते प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येचे गूढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बेल्लारे यांच्या हत्येप्रकरणी दोन स्थानिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत आणखी तपास करण्यात येत आहे. झाकीर आणि शफीक असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव असून दोघांचे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान अटक करण्यात आलेल्या दोघांचे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंध आहेत का याबाबत आता शोध घेण्यात येत असल्याची माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले आहे. हाती आलेल्या पुराव्याच्या जोरावर या झाकीर आणि शफीक यांना अटक करून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव प्रवीण नेट्टारू हे पोल्ट्रीचे दुकान बंद करून आपल्या गावी सुलिया येथे घरी परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी नेट्टारू यांच्यावर चाकूहल्ला करून त्यांची हत्या केली.

या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात निदर्शने सुद्धा करण्यात आली. यावेळी राज्यात भाजपचे सरकार असून देखील ते स्वतःच्या नेत्यांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचे म्हणत भाजप युवा शाखेने संताप व्यक्त केला. दरम्यान, या हत्येनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटेल यांच्या गाडीला अडवत आंदोलकांकडून मारहाण करण्यात आली. ही हत्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

हे सुद्धा वाचा…

शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेंना देण्यात आले पद

शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारेंना देण्यात आले पद

नागपूर हादरले! 11 वर्षीय मुलीवर नऊ जणांकडून महिनाभर बलात्कार

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!