33 C
Mumbai
Saturday, May 27, 2023
घरक्राईमकर्नल पुरोहितांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

कर्नल पुरोहितांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

मालेगाव येथे 2008 सालात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहित हा आरोपी आहे. या गुन्ह्यातून आपल्याला वगळावे या मागणीसाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. कर्नल प्रसाद पुरोहित याला हा मोठा झटका असल्याचं मानलं जात.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 2008 सालात मोठा बॉम्बस्फोट झाला होता. यात 6 जण जागीच ठार झाले होते. 100 जण जखमी झाले होते. या प्रकरणात 10 जण आरोपी आहेत. साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल प्रसाद पुरोहित सह 10 जण आरोपी आहेत. या बॉम्बस्फोटचे कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिग हे मास्टर माईंड असल्याचं म्हटलं जातं. बॉम्ब स्फोट 2008 सालात झाला आहे. म्हणजे गेली 15 वर्ष खटला सुरू आहे.

या खटल्यातून आपल्याला वगळावे अशी कर्नल प्रसाद पुरोहित याची मागणी आहे. या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. त्यावर अनेक वर्षे सुनावणी झाली. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने पुरोहित यांची याचिका फेटाळुन लावली. आपल्याला विरोधात कारवाई करताना crpc197(2) नुसार योग्य प्रकारे संमती घेण्यात आलेली नाही. त्याच प्रमाणे कामाचा भाग म्हणून आपण बॉम्बस्फोटच्या कटाच्या मिटिंगला आपण हजर होतो, असा त्याचा युक्तिवाद होता. मात्र, हा युक्तिवाद मुंबई हायकोर्टाने फेटाळला आहे.

2 जानेवारी 2023 रोजी तसा निकाल मुंबई हायकोर्टाने दिला आहे. याच निकाला विरोधात पुरोहित याने सुप्रीम कोर्टात स्पेशल लिव्ह पिटिशन केलं होतं. ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मुंबई हायकोर्टाच्या निकालात आम्हाला हस्तक्षेप करायला हवं. अस आम्हाला वाटत नाही. तुमच्या गुह्यात crpc 197(2) नुसार परवानगी घेण्याची काही गरज नाही.असा निकाल सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय आणि मनोज मिश्रा या न्यायमूर्ती नी आपल्या निकाल पत्रात म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा : 

मोठी बातमी : जातनिहाय जनगणना विरोधातील सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; बिहार सरकारला मोठा दिलासा

मुख्यमंत्री शिंदे डॉक्टर झाले याचा आनंद झाला पण…; राऊतांचे चिमटे

मंत्रालयातील दरवाजे नागरिकांसाठी केवळ 1 तासचं खुले!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी